बाणेर परिसरातील नागरिकांच्या वागण्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर

to.jpg
to.jpg

बालेवाडी : बाणेर रस्त्यावरील 'सकाळ नगर' येथे मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या पदपथाजवळच कचरावेचकांचे   कचरा संकलनाचे ठिकाण आहे. सगळीकडचा कचरा या ठिकाणी आणून मग पुढे पाठवला जातो. त्यांच्याकडून हे ठिकाण रोजच्या रोज साफ केले जाते. पण नागरिक पुन्हा दिवसभर येथे कचरा आणून टाकतात. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरते. त्याचबरोबर येथे कचरा वेचकांच्या गाड्या रस्त्याच्या बाजूला दिवसभर उभ्या असतात. त्यामुळे  येथे माशा, चिलटं, डास यांचा त्रास खूप वाढला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातील नागरिक या समस्येने त्रस्त आहेत. बाणेर रस्त्यावरील सकाळ नगर,  भागातील प्रणिती हाउसिंग सोसायटी जवळ सर्वे नंबर 81 लगत फुटपाथ  वरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कचऱ्याचा  फिडर पॉईंट आहे. त्यामुळे सगळ्या सोसायट्यांमधून जमा केलेला कचरा या ठिकाणी आणून तो वेगळा केला जातो आणि मग पुढे पाठवला जातो. हा पॉईंट मुख्य रस्त्याला लागून आहे, अनके सोसायटी मध्ये जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो.

येथे 'स्वच्छ'चे  कर्मचारी  रोजच्या रोज हा भाग साफ करतात,  पण पुन्हा दिवसभर येथे नको असलेला कचरा किंवा इतर गोष्टी नागरिक आणून टाकतात.  त्यामुळे दुर्गंधीने  या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच या ठिकाणी कचरा वेचक त्यांच्या गाड्या येथेच  दिवसभर  उभ्या करतात.  कोरोनाचे एवढे मोठे संकट समोर आहेच, पण त्याबरोबरच  कचऱ्यावर बसणाऱ्या  माशा, डासांमुळे  अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे हा फिटर पॉइंट दुसरीकडे हलविण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहे. तरी संबंधित विभागाने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन नागरिकांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.

गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या कचऱ्याच्या दुर्गंधीने हैराण आहोत. अनेक वेळा तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही,  तरी हा फिडर पॉईंट लवकरात लवकर दुसरीकडे हलविण्यात यावा.-निलेश हिंगे, सकाळ नगर 

हा फिडर पॉईंट या ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्याच्या संदर्भात सूचना दिल्या असून, लवकरच या भागातील नागरिकांचा हा प्रश्न तात्काळ सोडविण्यात येईल.-सुनील कांबळे,  वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com