लाखो लिटर पाण्याचा भीमनगरमध्ये  अपव्यय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पुणे ः भीमनगर येथे छोट्या कालव्याचा भराव फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. कालव्याचा भराव खचून पाणी वाहत असल्याचे सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महापालिका व पाटबंधारे विभागात याबाबत माहिती देऊनही दुपारपर्यंत कोणीही कर्मचारी या भागात फिरकले नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याची दखल घेतली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

कालवा फुटल्याने शिर्के कंपनीजवळच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नागरिकांनी हे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला; परंतु पाणी भीमनगरमधील घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा प्रवाह मोकळ्या जागेत सोडून दिला. याबाबत लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी अग्निशामक केंद्रामध्ये फोन करून मदतीसाठी याचना केली. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने भराव टाकून पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला. 

छोट्या कालव्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी सोडण्यात येत नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी छोट्या कालव्यात कुठून आले, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. भीमनगर परिसरात एका इमारतीचे बांधकामाचे काम सुरू असल्यामुळे तेथे कालव्यावर एक पूल बांधण्यात आला आहे. हा पूल बांधताना पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी दोन छोट्या पाइपलाइन टाकल्या आहेत. या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, जलपर्णीचे मोठे जाळे वाढले आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह पुढे जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे, तसेच परिसरात अनेक वर्षांपासून साफसफाई करण्यात आली नाही. यामुळे भराव फुटला कालव्यातील पाणी मोकळ्या जागेत वाहून गेले, अशी नागरिकांनी माहिती दिली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wastege of water in Bheemnagar