मांजरीमध्ये स्वस्त धान्य दुकानात सांडपाणी शिरल्याने नुकसान

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

मांजरी - हडपसर काळेपडळमधील गजानन कॉलनी परिसरातील वाहिनी तुंबल्याने घर व स्वस्त धान्य दुकानात सांडपाणी शिरून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी याच ठिकाणी सहा वेळा अशी घटना घडली आहे. त्याबाबत पालिका क्षेत्रीय कार्यालयात तक्रार देवूनही तात्पुरत्या डागडुजीशिवाय कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्याची तक्रार दुकान चालक मंजुळा तांबे यांनी केली आहे.

येथील कॉलनीत गजानन महिला बचत गटाच्या वतीने मंजुळा तांबे बारा वर्षापासून सरकार मान्य स्वस्तधान्य दुकान चालवीत आहेत. काल सायंकाळच्या सुमारास सांडपाणी वाहिनी तुंबल्याने त्यांच्या घराच्या स्नानगृहातून पाणी वर येऊन दुकान व घरात पसरले. त्यामध्ये दुकानातील गहू, तांदुळ, डाळीच्या पोत्यांसह घरातील अन्नधान्याचे भिजून मोठ्या प्रमाणात नुकसाण झाले आहे. तसेच या घाण पाण्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या स्वस्तधान्य दुकानाचे अठराशे ग्राहक असून त्यातील दोनशे ग्राहकांचे रेशनिंग वाटपासाठी आले आहे. सोमवारपासून त्याचे वाटप केले जाणार होते. मात्र, या सर्व धान्याची नासाडी झाल्याने आता वाटप करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांचेही नुकसाण झाले आहे.   

"आमचे घर व दुकानामागून पालिकेची सांडपाणी वाहिनी गेलेली आहे. ती वारंवार तुंबून घर व दुकानात पाणी शिरते. आजपर्यंत सहा-सात वेळा घरात हे पाणी शिरून नकसाण झाले आहे. पालिकेचे कर्मचारी येऊन तात्पुरती दुरूस्ती करून जातात. त्यावर ठोस उपाय योजना न केल्याने वारंवार ही परिस्थिती निर्माण होत आहे. पालिकेने झालेल्या नुकसाणीची भरपाई द्यावी.''
- मंजुळा पांडुरंग तांबे स्वस्तधान्य दुकानदार

Web Title: wastewater enter in grossary shop at manjari

टॅग्स