टिळकांच्या जीवनावरील चित्रपट पाहा यू-ट्यूबवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे  - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच...’ हा लोकमान्य टिळक यांचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच बुधवारी (ता. १) त्यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य माय बर्थराइट’ हा चित्रपट रसिकांना यू-ट्यूबवर सकाळी सात वाजल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तसेच, रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विनय धुमाळे यांनी दिली.

हा चित्रपट लोकसभा टीव्हीवरही रात्री अकरा वाजता दाखविण्यात येणार आहे. दोन तास २२ मिनिटांच्या या चित्रपटात टिळकांच्या जीवनातील विविधांगी पैलू पाहता येतील. अमित शंकर यांनी टिळकांची भूमिका साकारली असून, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विनोद नागपाल, नागेश भोसले आणि यशवर्धन बाळ यांच्या भूमिका आहेत.

हिंदी, इंग्रजी भाषेत 
याबाबत धुमाळे म्हणाले, ‘‘हा चित्रपट बुधवारपासून यू-ट्यूबवर पाहावयास उपलब्ध असेल. हा चित्रपट देशभरातील रसिकांना पाहता यावा, यासाठी २९ डिसेंबरपर्यंत हा चित्रपट देशभरातील २५ ठिकाणी दाखविण्यात येणार आहे. चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेत असून, तो प्रत्येकाला पाहता यावा म्हणून यू-ट्यूबवर प्रदर्शित केला जाणार आहे.’’

Web Title: Watch movies on Tilak life on YouTube