पदाधिकाऱ्यांच्या सुविधा वापरण्यावर वॉच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पुणे - महापालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये पदाधिकाऱ्यांना आलिशान सुविधा पुरविण्यात येणार असल्या तरी, त्यांच्या वापरण्यावर मात्र नियंत्रण राहणार आहे. या इमारतीतील वातानुकूलन यंत्रणा, दालनांमधील दिवे, पाणी आणि अन्य सुविधांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. विशेष म्हणजे पदाधिकारी-अधिकारी दालनात आल्यानंतरच तेथील "एसी' सुरू होईल. या सुविधांचा गरजेपेक्षा अधिक वापर होऊ नये, याकरिता ही यंत्रणा असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

या इमारतीचे काम अंमित टप्प्यात असून, येत्या पंधरा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचे उद्‌घाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या इमारतीमध्ये पदाधिकाऱ्यांकरिता प्रशस्त दालने आणि सभागृह उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी सर्वच प्रकारच्या सुविधा उपलब्ध राहणार आहेत; परंतु त्यांचा अतिवापर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर "एसी', दिव्यांसारख्या सुविधांचा मर्यादित आणि नेमका वापर व्हावा, यासाठी बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम (इमारत व्यवस्थापन यंत्रणा) बसविण्यात आली आहे. ज्यामुळे इमारत आणि त्यातील दालने, विभागात कोणत्या सुविधांचा वापर सुरू आहे, त्याचे प्रमाण आणि गरज या बाबींवर लक्ष ठेवणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. 

नव्या आणि जुन्या इमारतींमध्ये सुविधांचा जादा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही बसतो. तेव्हा या बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्यांदाच ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. 
श्रीनिवास कंदुल, अधीक्षक अभियंता, महापालिका 

Web Title: Watch the PMC officer