संवेदनशील केंद्रांवर वेब कास्टिंगद्वारे ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे - पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत होते; तसेच ५११ मतदान केंद्रांवरील हालचालींवरही प्रशासनाने ‘वॉच’ ठेवला होता.

पुणे लोकसभा मतदारसंघात १९९७ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सहा विधानसभानिहाय केंद्रांमधील ९१ संवेदनशील मतदान केंद्रांसह २२६ मतदान केंद्रे नियंत्रण कक्षाला जोडली होती; तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात २३७२ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ६२ संवेदनशील मतदान केंद्रांसह २८५ केंद्रांमधील हालचालींवर  प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत होते. 

सकाळी सहा वाजता ‘मॉक पोल’चाही आढावा घेण्यात आला. जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी स्वत: या कक्षातून मतदान केंद्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. 

राम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विकास भालेराव, व्ही. एस. घावटे, मनोज जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांची टीम दिवसभर परिस्थितीवर नजर ठेवून होती.

व्होटर हेल्पलाइनवर मतदारांच्या तक्रारी 
मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘व्होटर हेल्पलाइन’ कक्ष स्थापन केला होता. यामध्ये दिवसभरात सुमारे ३० ते ३५ मतदारांच्या तक्रारी आल्या. मतदान केंद्र कोठे आहे, मतदार यादीत नाव आढळून येत नाही, मागील निवडणुकीत मतदान करूनही यंदा मतदार यादीतून नाव गायब झाले, व्होटर स्लीप असूनही मतदार यादीत नाव आढळून येत नाही, अशा स्वरूपाच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.

Web Title: Watch by web casting at sensitive centers