Video : कोथरुडमधल्या कट्ट्यावर बांधले जात आहेत निकालाचे अंदाज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

मतदान केंद्रावर गर्दी होताच, कोथरूडमधल्या कट्ट्यावर निकालाचे आडाखे बांधले जात आहेत. कोथरूडला महायुतीचाच आमदार असेल असा दावा, भाजप-शिवसेनेचे नेते करत आहेत. तर मनसेनेही आमचाच उमेदवार जिंकणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे : मतदान केंद्रावर गर्दी होताच, कोथरूडमधल्या कट्ट्यावर निकालाचे आडाखे बांधले जात आहेत. कोथरूडला महायुतीचाच आमदार असेल असा दावा, भाजप-शिवसेनेचे नेते करत आहेत. तर मनसेनेही आमचाच उमेदवार जिंकणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे यांच्या थेट लढत होत आहे. शिंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची झाली आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी पावसाच्या हलक्या सर पडत होत्या. मात्र, मतदान सुरू होताच काही वेळात पाऊस पूर्ण थांबल्याने दुपारी बारा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गेल्या लोकसभेच्या मतदानापेक्षा जास्त मतदान होईल, असा विश्वास युती आणि आघाडीच्या नेत्यांना आहे.

पुणे शहरात शिवसनेला एकही जागा मिळालेली नसली तरी कोथरूडमध्ये शिवसेना-भाजप एकदिलाने काम करत आहे, त्यामुळे येथे चंद्रकांत पाटील यांचाच विजय होईल, असे मत शिवसेनेचे नेते पृथ्वीराज सुतार यांनी व्यक्त केले. तर उमेदावर घरचा असावा आणि तो काम करणारा असावा, अशी नागरिकांची भावना आहे. मनसेचे उमेदवार किशोर शिंदे हे घरचे असल्याने विजय आमचाच होणार आहे, असा विश्वास मनसेचे गणेश शिंदे यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch what all party workers have to say about Kothrud result