चास कमान धरणातून कालव्याद्वारे व नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

राजेंद्र लोथे
सोमवार, 22 एप्रिल 2019

चास - खेड तालुक्यातील नागरिक ज्या पाण्याची आतुरतेने वाट पहात होते त्या चासकमान धरणातून सोमवार ता 22 रोजी सकाळी सहा वाजता पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाच्या कालव्याद्वारे 550 क्यूसेक्स तर भिमा नदीपात्रात 300 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. 

सोडण्यात आलेले हे आवर्तन केवळ पिण्यासाठी असून, या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करू नये असे आवाहन धरणाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे तसेच उप अभियंता उत्तम राऊत यांनी केले आहे. या धरणात सध्या 16.77 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पाणी टंचाई व उदभवलेली दुष्काळी परिस्थिती पाहता सोडलेले आवर्तन हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार फक्त पिण्यासाठी असून, त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

Web Title: Water from the Chas dam through canal and river channel