धामणीत पथनाट्यातून पाणीबचतीचा संदेश (व्हिडिओ)

धामणी (ता. आंबेगाव) - पथनाट्याद्वारे पाणीबचतीचा संदेश देऊन प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबद्दल प्रबोधन करताना पिंपरी येथील एसएनबीपी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
धामणी (ता. आंबेगाव) - पथनाट्याद्वारे पाणीबचतीचा संदेश देऊन प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबद्दल प्रबोधन करताना पिंपरी येथील एसएनबीपी महाविद्यालयाचे विद्यार्थी.

पारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे पिंपरी-चिंचवड येथील एसएनबीपी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिराच्या माध्यमातून प्रभात फेरी काढून पथनाट्याद्वारे दुष्काळी परिस्थितीत पाणीबचतीचा संदेश देऊन प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाबद्दल प्रबोधन केले.

गुरुवारपासून (ता.१०) सुरू झालेल्या या हिवाळी शिबिराची बुधवारी सांगता झाली. मागील सहा दिवस विविध प्रकारची सामाजिक कामे करण्यात आली. या शिबिरात २० मुले आणि ३० मुली अशा एकूण ५० विद्यार्थांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्लॅस्टिक बंदी, पाणी वाचवा, स्त्रीभ्रूणहत्या आणि विविध विषयांवर पथनाट्ये सादर करण्यात आली. धामणी गावातील स्मशानभूमी, दशक्रिया घाट, गावातील रस्ते, चौक, कुलस्वामी खंडेराया मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.

मकर संक्रांतीच्या दिवशी गावातील महिलांना बोलावून हळदी-कुंकू व तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तब्बल १५० महिला सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात 
आली.  

पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच सागर जाधव, एसएनबीपी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. सुधीर आतवडकर, प्रा. हुमेरा अन्सारी यांचे भाषण झाले. 

या प्रसंगी प्रा. उमेश्वरी पाटील, प्रा. कमलाकर लाळगे, प्रा. नीलेश कोळगे, प्रा.पल्लवी विभूते, प्रा. आदिनाथ गाडेकर, प्रा. संतोष चौधरी, शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मेंगडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले, दादाभाऊ भूमकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन जाधव, आनंदा जाधव, विक्रम बोऱ्हाडे, अक्षय विधाटे, वैभव विधाटे, अमोल जाधव, हरिता कंपनीच्या संगीता वाळुंज, मनेश जाधव, सतीश देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते. अंकुश भूमकर यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com