वाघोलीसह चार गावांमध्ये आणखी काही दिवस पाणी टंचाई 

निलेश कांकरिया
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

वाघोली - भामा आसखेड धरणातील पाणी भीमा नदीत सोडण्यास तेथील धरण बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. यामुळे वाघोलीसह चार गावाना पाणी टंचाईला आणखी काही दिवस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सोमवारी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासह वाघोलीकरांनी पाटबंधारे अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यांनी पाणी सोडण्याचे आदेश ही दिले होते.

वढुखुर्द येथील बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने वाघोलीसह चार गावाना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे, वाघोलीचे माजी उपसरपंच समीर भाडळे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, शिवाजी शेलार यांनी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संदीप चोपडे यांची सिंचन भवन येथे भेट घेऊन भामा आसखेड धरणातून भिमा नदीला पाणी सोडण्याची विनंती केली. 

वाघोली ग्रामपंचायतीनेही पाणी सोडण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानुसार त्यांनी तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता बी के शेटे याना दिले. मात्र भामा आसखेड धरण बाधित शेतकऱ्यांनी त्याला विरोध करीत पाणी सोडू दिले नाही. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न जैसे थे राहिला. बुधवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करावी. अशी विनंती करणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. 

Web Title: water crisi in wagholi some some days