पावणे दोन लाख जणांवर पाणीसंकट

अनिल सावळे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - यंदा हिवाळ्यातच पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे. पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन लाखांहून अधिक नागरिकांसोबतच २० हजार जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यासाठी पुणे विभागात ९६ गावांसह ६५७ वाड्यांमध्ये ९२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यात सर्वाधिक ३१ टॅंकर, तर पुणे जिल्ह्यात ३० टॅंकर सुरू आहेत. 

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत यंदा परतीचा पाऊस कमी झाला, त्यामुळे हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचे संकट तीव्र होणार आहे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला असून, विहिरी आणि बोअरवेल्स अधिग्रहित करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Water crisis for over two lakh people