पिंपरी-चिंचवड शहरात उद्यापासून पाणीकपात 

पिंपरी-चिंचवड शहरात उद्यापासून पाणीकपात 

पिंपरी - पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात 25 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (ता. 2 मे) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे. 

दोन मे रोजी पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत महिनाभर सम तारखांना; तर तीन मे रोजी पाणीपुरवठा होणाऱ्या भागात विषम तारखांना पाणीपुरवठा होईल; तसेच जून महिन्यात उलट्या क्रमाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. 

सम तारखांचा पाणीपुरवठा 
अ क्षेत्रीय कार्यालय : किवळे परिसर : श्रीनगर, दत्तनगर, आदर्शनगर, इंद्रप्रभा, किवळे गावठाण, लेखा फार्म, देवीवन, माळवदेनगर, कातळे वस्ती, साळुंखे वस्ती. मामुर्डी परिसर : साईनगर, राऊतनगर, मामुर्डी गावठाण. रावेत परिसर : रावेत गावठाण, पोलिस पाटील बंगला, म्हस्के वस्ती, लक्ष्मीनगर, भोंडवे वस्ती. प्राधिकरण : पेठ 24, 27, 27-अ, व 28 मधील गंगानगर, साई दक्षता मित्र मंडळ परिसर. आकुर्डी परिसर : दत्तवाडी, विठ्ठलवाडी, रूपेश कॉलनी, एकतानगर, मोरेवाडा, विवेकनगर, तुळजाई वस्ती, श्रीकृष्णनगर, क्रांतीनगर, मुंबई-पुणे रस्ता पश्‍चिम बाजू, आकुर्डी गावठाण, जय गणेश व्हिजन, शुभश्री सोसायटी, पांढारक रवस्ती, सुभाष पांढरकर नगर, पंचतारानगर. मोरवाडी परिसर : पिंपरी न्यायालय परिसर, अमृतेश्‍वर सोसायटी आनंदनगर झोपडपट्टी (एमआयडीसी पाणीपुरवठा). पेठ 29च्या टाकीवरील भाग : शिंदे वस्ती, डी. वाय. पाटील कॉलेज परिसर, गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी, रजनीगंधा, चिंतामणी कॉलनी, सायली पार्क. 

ब क्षेत्रीय कार्यालय : वाकड, थेरगाव परिसर : विनोदे वस्ती, वाकड, काळाखडक, भुमकर वस्ती, भुजबळ वस्ती, सयाजी हॉटेल परिसर, वाकड गावठाण, वाकड रोड, म्हातोबानगर, शेख वस्ती, कलाटेनगर, ईडन गार्डन परिसर, दत्तमंदिर परिसर, गणेशनगर, शिव कॉलनी, मंगलनगर, वेणुनगर, थेरगाव गावठाण, दत्तनगर, सदाशिव कॉलनी, आनंद पार्क, ड्रायव्हर कॉलनी, अशोका सोसायटी, जय मल्हार नगर, स्वामी विवेकानंद नगर. पुनावळे, ताथवडे, बिजलीनगर टाक्‍यांचा परिसर : शिवनगरी, बिजलीनगर, गिरिराज, चिंचवडे नगर, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, बळवंतनगर, विजयनगर, मोरयानगर. प्रेमलोक पार्क पाण्याची टाकी : दळवीनगर, भोईरनगर, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, क्वीन्स टाऊन. 

क क्षेत्रीय कार्यालय : दापोडी स्टेडियम टाकी : एसआयए प्रकल्प, महात्मा फुले नगर, ज्योती इंग्लिश मीडियम स्कूल परिसर. नेहरूनगर टाकी : खराळवाडी, गांधीनगर, जैन संघटना परिसर, आचार्य अत्रे नाट्यगृह परिसर, स्वरगंगा, म्हाडा सोसायटी, नेहरूनगर, मनपा गोडाउन, नेहरूनगर शाळा परिसर, महेशनगर. वल्लभनगर टाकी : फुगेवाडी, उमेश लांडगे परिसर, मध्य कासारवाडी. 

ड क्षेत्रीय कार्यालय : बालेवाडी क्रीडा संकुल, कस्पटे वस्ती, विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे निलख, शास्त्रीनगर, रहाटणी गावठाण, रामनगर, श्रीनगर, विजयनगर परिसर, तापकीरनगर, काळेवाडी, वैदूवस्ती, सुदर्शननगर, प्रभातनगर (पिंपळे गुरव भाग) 

ई क्षेत्रीय कार्यालय : पेठ 6 (डब्ल्यूडी 4 टाकी 12 लाख लिटर) : पेठ 4, 6, 9, 7 व 10 मधील निवासी क्षेत्र, एमआयडीसी परिसर. भोसरी गावठाण टाकी : गव्हाणे वस्ती, आदिनाथनगर, रामनगर, जेपी नगर, शीतलबाग, डोळस वस्ती, नाशिक रोड, भोसरी (आश्रमशाळा टाकी) : गुळवे वस्ती, भगत वस्ती, शांतिनगर काही भाग. भोसरी (इंद्रायणी टाकी) : इंद्रायणीनगर (महाराष्ट्र कॉलनी, पेठ 12), बालाजीनगर. सॅंडविक कॉलनी (संत तुकाराम टाकी), आळंदी रस्ता : खंडोबामाळ, आपटे कॉलनी, नवग्रह मंदिर परिसर, दिघी रस्ता, गवळीनगर, राधानगरी, श्रीराम कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, सत्यनारायण सोसायटी, नूरमोहल्ला, रामनगरी, विठ्ठल पार्क, संभाजीनगर, श्रीकृष्ण कॉलनी, बोपखेल (बोपखेल टाकी) : केसरीनगर, बोपखेल गावठाण, रामनगर, गणेशनगर. चऱ्होली टाकी : चऱ्होली गावठाण, भोसले वस्ती, वाघेश्‍वरनगर, बुर्डे वस्ती, माठे वस्ती, खडकवासला, ताजणे वस्ती, रासकर सरपंचमळा, डी. वाय. पाटील कॉलेज, पूर्व पठारे मळा. दिघी मॅगझीन टाकी : दत्तनगर, गजानन महाराज नगर, श्रीराम कॉलनी 1 व 2, गणेशनगर. पांजरपोळ टाकी : पांडवनगर, सहकार कॉलनी, गुरुविहार सोसायटी, लांडगे वस्ती, पेठ 1, सद्‌गुरुनगर, फुलेनगर, रामनगर, राधाकृष्णनगर, हुतात्मा चौक, शास्त्री चौक, महादेवनगर. 

फ क्षेत्रीय कार्यालय : त्रिवेणीनगर : ज्योतिबा नगर रस्ता, तळवडे रस्ता, गणेशनगर, कृष्णानगर, तळवडे गावठाण, देहू-आळंदी रस्ता, इंद्रायणी सोसायटी, बाठे वस्ती. पेठ 2 : संजयनगर, राजनगर, संभाजीनगर (जी ब्लॉक), शरदनगर, गल्ली 1 ते 9, शाहूनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर (सचिन स्कीम), कृष्णानगर : पेठ 19 व 20, महात्मा फुलेनगर,  चिखली : पाटीलनगर, धर्मराजनगर, बग वस्ती, देहू-आळंदी रस्ता, पेठ 13 व 16 पश्‍चिम बाजू, कुदळवाडी, हारगुडे वस्ती, गणेश मंदिर परिसराची 
पूर्व बाजू, बालघरे वस्ती, भैरवनाथ मंदिर, जाधववाडी रस्ता, रिव्हर रेसिडेन्सी, जाधववाडी, बोलाईचा मळा गल्ली 1 ते 9, मधल्या पेठा, वडाचा मळा, आहेर कॉलनी, सावतामाळी मंदिर परिसर, पेठ 22 (बीएसयूपी स्कीम). 

विषम तारखांचा पाणीपुरवठा 
अ क्षेत्रीय कार्यालय :
किवळे, विकासनगर : बापदेवनगर, नेटके लाइन, भारतरत्न सोसायटी, श्री कॉलनी, संगीता अर्पाटमेंट, मुनीमजी बंगला, दांगट गणपती मंदिरापर्यंत व विकासनगर, एमबी कॅम्प, दांगट वस्ती, गणपती मंदिरामागील भाग, पेंडसे कॉलनी, टीसी कॉलनी, चर्च परिसर, शिंदे पेट्रोल पंप परिसर, मीना कॉलनी, शेळके वस्ती, तुपे वस्ती. प्राधिकरण : पेठ 23, वाहतूकनगरी, पेठ 25 व 26. निगडी गावठाण : मुंबई-पुणे रस्ता पश्‍चिम भाग, सिद्धिविनायक नगरी, श्रीनगरी, श्रीविहारनगरी, आशीर्वाद सोसायटी व दत्तनगर, पेठ 28 मधील साई दक्षता मित्र मंडळ परिसर. 
मोहननगर : चिंचवड स्टेशन पूर्ण, ऑटो क्‍लस्टर, इंदिरानगर, मगर झोपडपट्टी, दवाबाजार, साईबाबानगर, काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, फुलेनगर. अजंठानगर : ऐश्वर्यम्‌ सोसायटी. मोरवाडी : श्रद्धा सोसायटी परिसर, म्हाडा. 

ब क्षेत्रीय कार्यालय : इंदिरा कॉलेज, अक्षरा इंटरनॅशनल शाळा परिसर. ताथवडे 
थेरगाव : लक्ष्मणनगर, गुजरनगर, कावेरीनगर, 16 नंबर परिसर, पडवळनगर, शिवतीर्थनगर, सुंदर कॉलनी, पवारनगर 1 ते 7. एल्प्रो पाण्याच्या टाक्‍यांचा परिसर : चिंचवडगाव, केशवनगर, तानाजीनगर, माणिक कॉलनी, यशोपुरम, श्रीधरनगर, उद्यमनगर, भाटनगर. 

क क्षेत्रीय कार्यालय : जिल्हा रुग्णालय, नवी सांगवी, जुनी सांगवी 
स्टेडियम टाकी : गवळीमाथा, उद्यमनगर, नेहरूनगर टाकी : वल्लभनगर, गंगानगर, संत तुकारामनगर, सुखवानी, गंगास्काय सोसायटी. वल्लभनगर टाकी : कासारवाडी रेल्वे गेटखालील परिसर, धावडे मास्तर परिसर, शंकरवाडी, गुलीस्थाननगर, कासारवाडी रेल्वे गेट परिसर, श्‍याम लांडे परिसर, कुंदननगर, मनपा शाळा परिसर. 

ड क्षेत्रीय कार्यालय : काळेवाडी : नढेनगर, पंचनाथ कॉलनी, 36 चाळ, कुणाल आयकॉन टाकीचा भाग, शिवार चौक परिसर, शिवसाई रस्ता, कुणाल आयकॉन परिसर, संपूर्ण पिंपरी कॅम्प. संपूर्ण पिंपरीगाव. पिंपळे सौदागर टाकीवरून पाणीपुरवठा होणारा भाग : पवनानगर, काटे वस्ती, पिंपळे सौदागर गावठाण, सोसायटी परिसर, विश्‍वशांती कॉलनी. पिंपळे गुरव टाक्‍यांतून पाणीपुरवठा होणारा भाग : गावठाण, कवडेनगर, विनायकनगर, 18 मीटर रस्त्याचा पूर्व व पश्‍चिमेकडील भाग, एमके हॉटेल ते एसएम काटे चौक. 

ई क्षेत्रीय कार्यालय : मोशी : गायकवाड वस्ती, नागेश्‍वरनगर, इंद्रायणी पार्क, गणेशनगर, नंदनवन, गावठाण, लक्ष्मीनगर, बनकर वस्ती, सस्तेवाडी, आल्हाट वस्ती, शिवाजीवाडी, नागेश्‍वर विद्यालयामागील परिसर, जकात नाका परिसर, देहू रस्ता दोन्ही बाजू, आदर्शनगर, कचरा डेपो भाग 1 ते 4. बोऱ्हाडेवाडी टाकी : वाघेश्‍वरनगर, बनकर वस्ती खालचा भाग (चिंचेच्या झाडापासून), बनकर वस्ती (अशोक बनकर भाग), विनायकनगर, संजय गांधी नगर व सुवर्ण ढाबा परिसर, बोराटे वस्ती, नाशिक रल्ता, टेकाळे वस्ती, सिल्व्हर हॉटेल, बोऱ्हाडेवाडी, पंचशील हॉटेल, सावता माळीनगर. डब्ल्यूडी सेक्‍टर चार टाकी : तापकीरनगर, गंधर्वनगरी, खानदेशनगर, गणेश साम्राज्य, पेठ 3. भोसरी गावठाण टाकी : भोसरी गावठाण, लोंढे तालीम. 

लांडेवाडी चौक. एमआयडीसी पाणीपुरवठा : विकास कॉलनी, लांडेवाडी, माळीगल्ली, मदने निवास. दिघी नवी टाकी : दिघी गावठाण, विजयनगर, चौधरी पार्क, रुणवाल पार्क, काटे वस्ती, मंजुरीबाई शाळा परिसर, भारतमातानगर, गणेश कॉलनी 1 ते 4, हनुमान कॉलनी 1 व 2, सहकार कॉलनी 1 व 2, कृष्णानगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्‍वर पार्क, शिवनगरी, सावंतनगर, महादेवनगर. दिघी जुनी टाकी : साई पार्क, परांडेनगर, दत्तनगर, आदर्शनगर, शिवनगरी, सह्याद्री कॉलनी. चऱ्होली टाकी : कोतवालवाडी, काळजेवाडी, पठारे मळा, साठेनगर, पाटोळे वस्ती, भोसले वस्ती. वडमुखवाडी टाकी : पद्मावतीनगर, काळीभिंत, दत्तनगर, आझादनगर, चोविसावाडी, वडमुखवाडी, तापकीर वस्ती, शिवनगरी, जगताप वस्ती, कानिफनाथ गल्ली. दिघी मॅगझीन टाकी : मॅगझीन, डीएड कॉलेज, मोझे शाळा, साईनगरी, साई मंदिर, लक्ष्मीनारायण नगर, ताजणे मळा, पठारे कॉलनी, प्रगती हॉटेल मागे. पांजरपोळ टाकी डब्ल्यूडी 4 : शिवशंकर 1 ते 4, देवकर वस्ती, गणराज कॉलनी 1 ते 4, मधुबन, अक्षयनगर, आनंदनगर. 

फ क्षेत्रीय कार्यालय : कृष्णानगर : रुपीनगर, सहयोगनगर, ज्योतिबानगर औद्योगिक भाग, सोनवणे वस्ती, गणेशनगर 1 व 2, विघ्नहर्ता सोसायटी 1 व 2, शेलार वस्ती, मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, ताम्हाणे वस्ती, यमुनानगर, प्रभाग 27 व 28. अजमेरा मासुळकर कॉलनी : वास्तू उद्योग, अशंता उद्यमनगर. मोरवाडी परिसर : म्हाडा संत ज्ञानेश्वर कॉलनी, श्रद्धा हेरिटेज. चिखली परिसर : गावठाण लाइन, रामदासनगर, महादेवनगर, गीताई कॉलनी, लोंढे वस्ती, रोकडे वस्ती, चिखली गावठाण, मशीद परिसर, राजवाडा, टाळ मंदिर, पोस्ट ऑफिसपर्यंत. चिखली पाटीलनगर परिसर : नागेश्‍वर शाळा, व्हस्टिेरिया सोसायटी, इंद्रप्रस्थ कार्यालय परिसर. चिखली परिसर : धर्मराजनगर, बग वस्ती, देहू-आळंदी रस्ता परिसर, कोयनानगर, पूना हॉस्टेल, एश्‍वर्यम, सुदर्शनगर, नेवाळे वस्ती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com