रात्री सोडले धरणातून पाणी अन् सकाळी सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

जुनी सांगवी : शनिवारी रात्री पवना व मुळा धरणातून २००४ नंतर दुसऱ्यांदा सततधार कोसळणारा पाऊस व मुळशी पवना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येथील नदीकिनारा रहिवाशी भागात पुरस्थिती निर्माण झाली. प्रथम बांधकाम मजूर कामगारांची झोपडपट्टी असलेल्या मुळानगर भागात शनिवार (ता.3) पहाटे तीनच्या सुमारास पाणी घुसले. रात्री नागरिकांना जुजबी तोंडी माहीती देवून प्रशासनाकडून सोपस्कार पुर्ण केले, मात्र यंत्रणा अद्यायवत न ठेवल्याने अनेकांचे संसार पाण्यात गेले.

अचानक वाढत गेलेल्या पाण्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. संभाव्य धोक्याच्या पाणीपातळीची माहीती असूनही सकाळी यंत्रणा कामाला लागली तोपर्यंत येथील मधुबन सोसायटी, संगमनगर, ममतानगर, प्रियदर्शनीनगर, पवनानगर जम चाळ इत्यादी रहिवाशी भागाला पाण्याने विळखा घालून नागरीकांचे संसार पाण्यात गेले. प्रशासनाकडून मदत रात्रीच तात्काळ व्यवस्था झाली असती तर, धांदल उडाली नसती. रात्री पाणी सोडले व प्रशासनाकडून सकाळी माहीती देत भोंग्याच्या गाड्या फिरवल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

पुरसंरक्षक भितींचे कामही अर्धवट- मुळानदीकिनारा भागात काही वर्षापासून येथील पुरसंरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्वरूपात आहे. याचा फटकाही स्थानिक रहिवाशांना बसला आहे.

पुरसंरक्षक भिंतीचे काम पुर्ण केल्यास अशा आपत्तीपासून संरक्षण होईल.याचबरोबर नदीपात्रात ईतर राडारोडा जाणार नाही
- संजय गायकवाड- मुळा नदीकिनारा बाधीत रहिवाशी

प्रशासनाकडून नागरीकांना वेळेत मदत मिळाली नाही.तर सकाळी यंत्रणा दिसू लागली तोपर्यंत अनेकांचे संसार भिजले होते.
-सुजाता निकाळजे पवना घाट परिसर रहिवाशी
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water from the dam left at night and alert in the morning Juni sangavi