इंदापूर तालुक्यातील वडापुरी, काटी परिसरातील पाझर तलावात पाणी सोडावे - सुनिल लवटे

आदम पठाण
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

वडापुरी - इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली, काटी, वडापुरी, वरकुटे, तरंगवाडी परिसरातील पाझर तलावात पाणी नसल्याने तसेच या वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने ऑगस्ट महिन्यातच पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे प्राधान्याने या पाझर तलावात पाणी सोडावे अशी मागणी इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुनिल लवटे यांनी केली आहे. 

समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाझर तलाव भरलीच नाहीत त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याने वरील पाझर तलाव भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांमधून वाढू लागली आहे. 

पाझर तलावात पाणी कधी सोडले जाणार याकडे या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ याची वाट पाहत आहेत. 

लवटे पुढे म्हणाले की, पुण्यातील असलेली धरणे पूर्ण क्षमतेने भरत आली आहेत. त्यामुळे खाली येणाऱ्या पाण्याने पाझर तलाव भरली तर उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून, पाझर तलावात पाणी सोडले तर त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे लवटे म्हणाले.

Web Title: Water drop off in the Pajar lake in Vadapuri, Kati area of ​​Indapur taluka - Sunil Lavte