Video : चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पिंपरी :  जोरदार पावसामुळे चिंचवड येथील मोरयागोसावी समाधी मंदिराचे परिसराला पाण्याचा वेढा पडला आहे. मुख्य मंदिरासह अन्य सात समाधी मंदिरांमध्ये  पुराचे पाणी शिरले आहे.

पिंपरी : जोरदार पावसामुळे चिंचवड येथील मोरयागोसावी समाधी मंदिराचे परिसराला पाण्याचा वेढा पडला आहे. मुख्य मंदिरासह अन्य सात समाधी मंदिरांमध्ये  पुराचे पाणी शिरले
आहे

चिंचवड पिंपरी लिंक रस्त्याने अहिंसा चौकाकडे जाताना भारतीय स्टेट बँकेच्या वळणावर बस थांब्याच्या परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय झाली पावसाचे पाणी जाण्यासाठीची गटारांची  आउटलेट तुंबल्याने पाण्याचा निचरा न झाल्याचा हा परिणाम आहे.

चिंचवड स्टेशनहुन चिंचवड गावाकडे जाताना पुलावरील सखल भागात पाणी साचले. त्यामुळे  दुचाकीस्वारांची गैरसोय झाली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water entered Moraya Gosavi temple in Chinchwad