पाषाणमध्ये 20 घरात शिरले पाणी

पांडुरंग सरोदे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढली
- रविवारी सकाळी बालेवाडी गावातील भीमनगर, गणपती घाट परिसरातील 20 घरामध्ये पाणी शिरले.
- काही नागरीक स्वत: बाहेर पडले, तर 30 हून अधिक लोकांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षित ठिकाणी हलविले. 

पुणे : मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे रविवारी सकाळी बालेवाडी गावातील भीमनगर, गणपती घाट परीसरातील 20 घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे काही नागरीक स्वत: बाहेर पडले, तर 30 हून अधिक लोकांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षित ठिकाणी हलविले. 

मुळशी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढविल्याने शनिवारपासून मुळा नदी दुथडी भरुन वाहु लागली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील घरे, झोपडयांमध्ये पाणी शिरु लागले आहे. 

रविवारी सकाळी नऊ वाजता बालेवाडी गावातील भीमनगर व गणपतीचा घाट या परिसरामधील नदी किनाऱ्यावरील घरे व झोपडयात पाणी शिरले. दरम्यान, शनिवारी रात्रीपासुनच सतर्क झालेल्या पाषाण अग्निशामक केंद्रच्या जवानानी तत्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. 

प्रारंभी भीमनगर वसाहतीमधील 15 ते 20 लोकांना बाहेर काढले, त्यानंतर गणपती घाट परिसरातील 15 ते 20 जणांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यानंतरही नागरिकांना नदीच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन अग्निशामक दलाकडुन करण्यात येत होते. पाषाण अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी मेमाणे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water enters the 20 house in at Pashan