उजनी धरणातून भीमेत विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

इंदापूर - उजनीवरील पुणे जिल्ह्यातील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे दौंड येथे भीमा नदीत ५७६५४ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. सध्या धरणातील पाणीसाठा ६९.२६ टक्के झाला आहे. भीमा नदीत २१ ऑगस्ट रोजी ५८ हजार क्‍युसेकहून जास्त पाणी विसर्ग येत होता. मात्र आज सकाळी या विसर्गमध्ये थोडी घट झाली आहे. लवकरच धरण शंभर टक्के भरण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, पाणी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आल्याची माहिती उजनी धरणाचे शाखा अभियंता बाळकृष्ण क्षीरसागर व  सूरज काटकर यांनी दिली. २२ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या यशवंत सागरमधील पाणीपातळी ४९५.३५० मीटर असून धरणातील एकूण साठा १००.७६ टीएमसी इतका आहे. धरणातील उपयुक्त साठा ३७.१० झाला असून धरणातील पाण्याची टक्केवारी ६९.२६ टक्के झाली आहे. उजनी धरणात आतापर्यंत २९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे पाणी नदीत येण्यासाठी ४ ते ६ तासाचा अवधी लागत असल्याने नदीकाठी सावधगिरीचा इशारा देण्यात आला. मात्र २१ ऑगस्ट रोजी दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने नदीकाठच्या लोकांची पाण्यातील वीजपंप वर घेण्यासाठी तारांबळ उडाली. 

धरणासाठी त्याग केलेल्या प्रकल्पग्रस्तांना बारमाही पाणी द्यावे, तसेच सोलापूर शहरास बंद नळातून पाणी द्यावे, अशी मागणी सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, हनुमंत जाधव, बाळासाहेब मोरे, सतीश व्यवहारे, भास्कर गुरगुडे, धनाजी गोळे, ॲड. रणजित बाबर, संग्रामसिंह देशमुख, बाळासाहेब जगताप, सचिन जाधव, अण्णासाहेब कोळेकर या शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Water flow from the Ujani dam in the Bhima river