पुण्यात पुरजन्य स्थिती; 'या' भागांतील घरांमध्ये शिरले पाणी

ज्ञानेश सावंत
रविवार, 4 ऑगस्ट 2019

खडकवासला धरणातील विसर्ग वाढला
- शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट वसाहतीसह येरवडा, धानोरी, कळस, सिंहगड रस्ता आणि बोपोडी-दापोडीतील नदीकाठच्या साधारणपणे चारशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
- अन्य काही भागांतील लोकांना घरे सोडण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 

पुणे : खडकवासला धरणातील विसर्ग वाढल्याने शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट वसाहतीसह येरवडा, धानोरी, कळस, सिंहगड रस्ता आणि बोपोडी-दापोडीतील नदीकाठच्या साधारणपणे चारशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले असून, अन्य काही भागांतील लोकांना घरे सोडण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 

शहरात सर्वाधिक बोपोडी-दापोडीतील शंभर घरांना धोका असल्याचे दिसून आले असून,
त्यापाठोपाठ नगर रस्ता पसिरातील 90 ते 95 घरे बाधित झाल्याचे महापालिकेने कळविले. दरम्यान, नदीपात्रातील पाण्याचे प्रमाण वाढल्याने संभाव्य धोका असलेल्या भागांतील रहिवाशांना हलविण्यात येणार आहे. त्यासाठी विविध भागांतील 37 शाळांमध्ये नागरिकांच्या राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळीत जवळपास शंभर टक्के पाणीसाठा आहे. 

खबरदीराचा उपाय म्हणून सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यानुसार रविवारी सकाळी खडकवासल्यातून सुमारे41 हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. मुठा-मुळा नदीपात्रालागतचा काही भाग बाधित होण्याची भीती असल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन महापालिकेने शनिवारी केले होते. त्यानुसार येरवड्यातील शांतीनगर, साईनाथ नगर, शास्त्री नगरमधील दीडशे जणांना हलविले असून, त्यांच्या राहण्याची सोय शाळेत करण्यात आली आहे. 

या भागांतील घरांमध्ये पाणी शिरले 
सिंहगड रस्ता (द्वारका सोसायटी), येरवडा, बोपोडी, दापोडीतील काही भाग, धानोरी,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Flows into homes due to Flood situation in pune