हरिता कंपनीकडून जलसंधारणाच्या कामांना सुरुवात

सुदाम बिडकर 
शनिवार, 26 मे 2018

हरिता कंपनीचे योगेश्वर पाटील म्हणाले, रोडेमळा येथील तळ्यातील अंदाजे 1863 घनमीटिर गाळ काढण्यात येणार आहे. यामध्ये 4.45 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या 10 विहीरी व तीन कुपनलिका यांची पाण्याची पातळी वाढुन सुमारे 50 एकर शेतीला त्याचा फायदा होणार आहे.

पारगाव (पुणे)  : आंबेगाव तालूक्यातील धामणी येथे हरिता कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत जलसंधारणाच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. रोडेमळा येथे माती नालाबांध खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख शिवाजी राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आला. 
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समीती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच सागर जाधव, पत्रकार विठ्ठल जाधव, अंकुश भुमकर, निलेश रोडे, विक्रम बार्हाडे, दिपक जाधव, अमोल जाधव, सुहास रोडे, मिलिंद रोडे, हरिता कंपनीचे विभागीय आधिकारी योगेश्वर पाटील, सोमनाथ काटकर, डॉ. राक्षे, संगिता वाळुंज आदी उपस्थित होते. 
हरिता कंपनीचे योगेश्वर पाटील म्हणाले, रोडेमळा येथील तळ्यातील अंदाजे 1863 घनमीटिर गाळ काढण्यात येणार आहे. यामध्ये 4.45 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या 10 विहीरी व तीन कुपनलिका यांची पाण्याची पातळी वाढुन सुमारे 50 एकर शेतीला त्याचा फायदा होणार आहे. तसेच यामधील गाळ परिसरातील शेतकर्यांनी वाहुन नेऊन आपापल्या शेतात टाकल्याने चार एकर क्षेत्र नव्याने लागवडी खाली येणार आहे. हरिता कंपनीच्या वतीने पहाडदरा येथे दोन ठिकाणी गुळाणी, जरेवाडी येथे प्रत्येकी एक ठिकाणी जलसंधारणाची कामे सुर करण्यात येणार आहे.  

Web Title: water harvesting in ambegaon