Pune Rains : पुण्यात पुन्हा पावसाचा हाहाकार; ट्रेजर पार्कमध्ये पुन्हा शिरले पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

Pune Rains : पुणे : ​ पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले तर, अनेक घरात पाणी शिरले आहेत. मध्यरात्री बारा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली त्यानंतर, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. अनेक भागातील रस्त्यांवरही पाणी साचले आहे. 

Pune Rains : पुणे : पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले तर, अनेक घरात पाणी शिरले आहेत. मध्यरात्री बारा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली त्यानंतर, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. अनेक भागातील रस्त्यांवरही पाणी साचले आहे. 

कात्रज परिसरातील नवीन वसाहत येथील ओढा भरून वाहू लागला असून त्याचे पाणी नवीन वसाहतीतील अनेक घरात शिरले आहे. शहरातील येरवड्यातील शांतीनगर वसाहत, घोरपडी गाव, वानवडीतील आझादनगर, बी.टी.कवडे रस्ता, पद्मावती, मार्केटयार्ड येथील अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. या भागात अग्निशमन दलाच्या जवानांनी पाचारण करण्यात आले आहे.

लोहगाव येथील जकात नाक्याजवळ एक खाजगी कंपनीची बस पाण्यात अडकून पडली होती. या बसमध्ये 20 कर्मचारी अडकून पडले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने या सर्वांना सुखरूप बाहेर काढले तर, पुण्यातील बीटी कवडे रस्त्यावरील ट्रेजर पार्कमध्ये पाणी साचले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water in the house again due toriental rain in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: