पाण्यासाठी आणखी सहा महिने प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

उंड्री - उंड्री आणि पिसोळीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. महापालिकेत समावेश झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल, अशी उंड्रीवासीयांची अपेक्षा होती. परंतु वर्ष उलटल्यानंतरही महापालिकेने आपला वायदा पुरा केला नाही. आता उंड्रीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी अजून सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. 

उंड्री व पिसोळी गावांतील पाणीप्रश्‍नाबाबत खासदार सुप्रिया सुळे पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची ११ जूनला भेट घेतली. या बैठकीत पंचायत समिती सदस्य सचिन घुले यांनी महंमदवाडी, खडी मशिन चौक, पुण्यधाम आश्रम येथून पाणीपुरवठ्यासाठी जोड देता येईल असा उपाय सुचविला. पिसोळीचे सरपंच नवनाथ मासाळ यांनी बेकायदा नळ जोडण्यांचा प्रश्‍न उपस्थित करीत पाणी खरेदीसाठी सोसायट्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड पडत असल्याकडे लक्ष वेधले. यावेळी उंड्रीचे सरपंच निवृत्ती बांदल, उपसरपंच नितीन घुले, प्रवीण आबनावे यांनीही सूचना मांडल्या. 

त्या वेळी राव यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सहा महिन्यांत सोडविण्याचे आश्‍वासन दिले तसेच या गावांना भेटी देऊन पाणीप्रश्‍न सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

टाकीचे काम सहा महिन्यांत
नव्वद लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम सध्या येवलेवाडी येथे सुरू आहे. ते सहा महिन्यांत पूर्ण होईल. त्या दरम्यान अंतर्गत जलवाहिन्यांची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. 

Web Title: water issue waiting supriya sule