खडकवासला धरण होतेय 'फुल्ल'; गुरूवारी सोडणार पाणी

खडकवासला धरण होतेय 'फुल्ल'; गुरूवारी सोडणार पाणी

खडकवासला - धरणातील पाणीसाठा आज बुधवारी सकाळी 87 टक्के होता दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे धरणात पाणी जमा होण्याचे प्रमाण वाढले संध्याकाळी पाच वाजता 90टक्के पाणीसाठा जमा झाले.

पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी कालव्यातून 500 क्‍युसेक पाणी सोडण्याचा निर्णय झाला. तसेच संध्याकाळी सहानंतर आणि जमा होण्याचे प्रमाण वाढल्याने गुरुवारी पहाटे धरणातून सतराशे क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात येईल.अशी माहिती अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. 

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे सुमारे साडेपाच हजार क्युसेसचा येवा होता. तो संध्याकाळी सहा वाजता सात हजार क्यूसेक पर्यन्त वाढला.परिणामी खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. हा येवा असाच येत राहिल्यास पहाटे तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास खडकवासला।धरण 100 टक्के भरेल त्यानंतर जेवढा येवा तेवढे पाणी मुठा नदीत सोडावे लागणार आहे. 

पानशेत निम्मे भरले
खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यानंतर पानशेत धरण रात्री 43 टक्के भरले आहे. उद्या दिवसभरात ते 50 टक्के होईल. तर वरसगाव धरणात 31टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे टेमघर धरणात 15टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. चारी धरणात मिळून 11 टीएमसी म्हणजे 37 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
 
टेमघरला1500 मिलीमीटर पाऊस
धरणातील पाणीसाठा साधारणता एक जून पासून मोजण्या सुरुवात केली जाते  त्यानुसार मागील 40 दिवसात टेमघर येथे एक हजार 520 मिलिमीटर पाऊस पडला आहे. वरसगाव पानशेत धरणात सुमारे एक हजार तर खडकवासला धरणात आतापर्यंत 427 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com