पाझर, गाव तलाव भरले तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

जादा पावसाचा असाही फायदा
आतापर्यंत हे सर्व प्रकल्प दरवर्षी जिल्ह्यातील धरणांतील पाण्याने भरले जात.
धरणांतील अतिरिक्त पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात येत असे आणि या पाण्याने ते भरून घेतले जात.
यंदा पावसाच्या पाण्यानेच बहुंताश तलाव व बंधारे पाण्याने काठोकाठ भरले आहेत.

काही भागांत मात्र चणचण
दुष्काळी भागातील बारामती, इंदापूर तालुक्‍यातील सुमारे ३९ लघू प्रकल्पांत अद्यापही निम्मेच पाणी.
कॅनॉलमधील पाण्याद्वारे प्रकल्प भरण्याची ग्रामस्थांची मागणी.
या लघू प्रल्पांसाठी धरणातील अतिरिक्त पाणी सोडावे लागणार.

पुणे - यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील गाव व पाझर तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, वळण बंधारे आणि साठवण बंधारे आदी २३५८ लघुपाटबंधारे प्रकल्पांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या दोन दशकांत यंदा प्रथमच केवळ पावसाच्या पाण्याने हे सर्व प्रकल्प काठोकाठ भरून वाहू लागले आहेत.

८४५.७६ मि.मी. - जिल्ह्यात दरवर्षी पडणारा सरासरी पाऊस 
१५६३.९९ मि.मी. - या वर्षी झालेला पाऊस

लघू प्रकल्पांची संख्या
६१६ - एकूण पाझर तलाव 
105 - गाव तलाव
339 - कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे     
738 - वळण बंधारे     
560 - साठवण बंधारे 
39 - अपूर्ण भरलेले प्रकल्प 

जिल्ह्यातील लघू प्रकल्प यंदा पावसाच्या पाण्याने काठोकाठ भरले आहेत. जिल्हा परिषदेने काही प्रकल्पांमधील गाळ काढून, खोलीकरण केले आहे. त्यामुळे साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. सर्व तलावांमधील एकूण पाणी साठवण क्षमतेची माहिती जमा करण्यात येत आहे.
- शशिकांत औटी, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water lake full by rain