केशवनगरमध्ये पाणीगळती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

केशवनगर - केशवनगर भागातील रहिवाशांना उन्हाळ्यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना, दुसरीकडे कुंभारवाड्यानजीकच्या रस्त्यावर पाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

या भागात एकूण सहा वॉर्ड आहेत. येथे दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही भागात पाणी न मिळाल्यामुळे नागरिक मुंढव्यातून पाणी आणत आहेत. तसेच पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. एकीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे पाणी गळती होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरात होणारी पाणीगळती त्वरित रोखावी, अशी मागणी नागरिकांनी 
केली आहे. 

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

महापालिकेच्या कारभारावर नाराजी
कुंभारवाड्यानजीकच्या रस्त्यावर असलेल्या जलवाहिनीतून गेल्या काही दिवसांपासून पाण्याची गळती होत आहे. यामुळे हे पाणी रस्त्यावर साचून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही भागांत पाणी मिळत नाही, तर काही भागात पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त केली आहे. 

Web Title: water leakage in keshavnagar