महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

खडकवासला - टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला धरण क्षेत्रांत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणसाठ्यात सुमारे सव्वा टीएमसीने वाढ झाली आहे. हे पाणी शहराला सुमारे महिनाभर पुरेल एवढे आहे. 

या चार धरणांत बुधवारी सकाळी ३.६८ टीएमसी पाणीसाठा होता, तो गुरुवारी संध्याकाळी ४.८१ टीएमसी एवढा झाला आहे. गेल्या दीड दिवसात धरण साठ्यात १.१८० टीएमसीची वाढ झाली आहे. 

वरसगाव धरणात पाणी जमा
या धरणात आता पाणी जमा होऊ लागले आहे. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या धरणातील मृत पाणीसाठादेखील सोडला होता. मात्र गेल्या दीड दिवसात या धरणात ०.३८० टीएमसी (३ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे, अशी माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता टी. डी. पाटील यांनी दिली.

टेमघरला जोरदार पाऊस
या धरणात बुधवार सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत ११९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांत धरण क्षेत्रात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

गेल्या दीड दिवसात धरणांत जमा झालेले सव्वा टीएमसी पाणी शहराला महिनाभर, तर शेतीसाठी १५ दिवस पुरेल एवढे आहे. चारही धरणांत मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे.  
- पांडुरंग शेलार,  कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे, विभाग

Web Title: water level increase Khadakwasla dam