पुण्यात नदीकाठांवर अतिदक्षतेचा इशारा; पाणी विसर्गात वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे सुमारे 100 टक्के भरली आहेत. चारही धरणात मिळून 28.95 टीएमसी (99.31 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 49 हजार क्यूसेकने सोमवारी सकाळी 11 वाजता विसर्ग होणार असल्यामुळे नदी काठावर पुन्हा पाणी वाढणार आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे सुमारे 100 टक्के भरली आहेत. चारही धरणात मिळून 28.95 टीएमसी (99.31 टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी चारही धरणांत 25.56 टीएमसी (87.68 टक्के) पाणी होते. 

हंगामातील सर्वाधिक विसर्ग सोमवारी सकाळी 11 वाजता होणार असल्यामुळे नदी काठपासून 100 ते 200 मीटरमध्ये महापालिका प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level will be increased on Mutha river in Pune