वाघोलीत रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप; वाहतूकीचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

वाघोली : दोन दिवसापासून सूरु असलेल्या संततधार पावसाने पुणे नगर महामार्गाला वाघोलीतील उबाळे नगर परिसरात पुन्हा ओढ्याचे स्वरूप आले. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

वाघोली : दोन दिवसापासून सूरु असलेल्या संततधार पावसाने पुणे नगर महामार्गाला वाघोलीतील उबाळे नगर परिसरात पुन्हा ओढ्याचे स्वरूप आले. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

 परिसरातील ओढे नाले बुजविल्याचा, रस्त्याच्या साईड पट्ट्या भरल्याचा हा परिणाम आहे. ओढे-नाले खुले केल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. 

सार्वजनिक बांधकाम विभाग, पी एम आर डी ए, तहसील कार्यालय, वाघोली ग्रामपंचायत या चार शासकीय यंत्रणेच्या अधिपत्याखाली हा भाग येत असल्याने संयुक्त कारवाईची गरज आहे. अन्यथा पावसानंतर या समस्येला नागरिकांना तोंड देण्याशिवाय पर्याय नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water logging on roads of Wagholi