हडपसर : वैदुवाडी येथील पेट्रोल पंपावर पाणी मिश्रीत पेट्रोल

वैदूवाडीमधील विद्या (कोंडे देशमुख) पेट्रोलपंपावर आज सकाळी पेट्रोल भरून गेलेली अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडली.
Water Mixed Petrol
Water Mixed PetrolSakal

हडपसर : येथील रामटेकडी वैदूवाडीमधील विद्या (कोंडे देशमुख) पेट्रोलपंपावर (Petrol Pump) आज सकाळी पेट्रोल भरून गेलेली अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडली. वाहनधारकांनी चौकशी केली असता पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल (Water Mixed Petrol) भरले गेल्याने हा प्रकार घडल्याचे समजले. त्यामुळे फसवणूक झालेल्या वाहनधारकांनी पेट्रोलपंपावर एकत्र येऊन कारवाई करण्याची मागणी केली.

आज सकाळी या पंपावर पेट्रोल भरून जाणाऱ्या सुमारे तीसच्यावर वाहनधारकांनी पेट्रोलपंपावर येऊनृ पाणी मिश्रीत पेट्रोल वाहनात सोडल्याची तक्रार व्यवस्थापकाकडे केली. पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. अनेक वाहन चालकांनी आपल्या दुचाकी पुन्हा या पंपावर आणून वाहनांच्या टाकीतून पेट्रोल बाहेर काढून पाहिले.

Water Mixed Petrol
कऱ्हाडला ११ जानेवारीपासून 'एकवेळ'च पाणी पुरवठा : मुख्याधिकारी डाके

त्यामध्ये पाणी मिश्रीत पेट्रोल आढळून आले. आम्हाला भेसळयुक्त पेट्रोलचा फटका बसला आहे. पेट्रोलचे पैसे वाया गेले, याशिवाय आज कामावरही जाता आले नाही. वाहनांचेही नुकसान झाले आहे. अशी तक्रार राहुल कोरके, सागर पवार, निलेश शिवशरण, किशोर धोत्रे, राजेंद्र जाधव, तौफिक शेख, फय्याज शेख आदी ग्राहकांनी केली.

दरम्यान, पंपावर गर्दी जमून गोंधळ सुरू झाला होता. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. कंपनीच्या मोबाईल टेस्टींग विभागाने व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येथील पेट्रोलचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती नायब तहसीलदार सचिन ढोले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com