घोरपडीत लाखो लिटर पाणी रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

घोरपडी - एम्प्रेस गार्डनशेजारील कालव्यातून होळकर जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी पाण्याची पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. साधारण वीस वर्षे जुनी असलेली पाइप लाइन फुटल्यामुळे रस्त्यावर पाण्याचे तळे साचून जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत पाण्याचे ओढे वाहू लागले होते. या पाण्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. 

एम्प्रेस गार्डन शेजारील कालव्यातून होळकर जलशुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. या पाइपलाइनमधून अनेक वर्षांपासून गळती सुरू आहे. याविषयी पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे परिसरात पाणी साचत आहे. या पाण्याचा वापर अनेक नागरिक गाड्या आणि भाजीविक्रेते भाजीपाला धुण्यासाठी  करतात.

यासंदर्भात कॅंटोन्मेंट बोर्डातील अधिकाऱ्यांनी अनेक नागरिकांवर कारवाई केली होती, परंतु पुन्हा काही दिवसांनी ‘जैसे थे परिस्थिती’ निर्माण झाली आहे.  पाणीगळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी मनीषा शेकटकर म्हणाल्या, ‘तातडीने काम पूर्ण करून होळकर केंद्रासाठी पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.

Web Title: Water Pipeline Leakage water loss