प्रदूषित पाणी थेट नदीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

दापोडी ते चिंचवड-लक्ष्मीनगरदरम्यान आठ ठिकाणी मैला मिश्रित प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याने नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. फुगेवाडी परिसरात नाल्यातून येणारे प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून जलपर्णी वाढण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी - नदी सुधारणा योजनेची नुसतीच चर्चा सुरू असून, पवना नदीतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

दापोडी ते चिंचवड-लक्ष्मीनगरदरम्यान आठ ठिकाणी मैला मिश्रित प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याने नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. 
फुगेवाडी परिसरात नाल्यातून येणारे प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून जलपर्णी वाढण्याची शक्‍यता आहे. 

जुनी सांगवी परिसरातून वाहणाऱ्या नदीपात्रात नाल्यातून येणारे पाणी मिसळले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. दापोडीमधील एस. एम. काटे चौकातून वाहणारा नाला, पिंपरी गाव, पिंपरी आणि लक्ष्मीनगर परिसरातील नाल्याचे पाणी थेट नदीत मिसळते. नाल्यामधून नदीत मिसळणारे पाणी प्रक्रिया करून सोडावे, असा नियम आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.  

नदीत होणाऱ्या प्रदूषणाकडे महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याने ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून ठोस उपाययोजना होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Pollution in River