आंबेगाव खुर्द मध्ये पाणी टंचाई ;महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त

जेट मशीनला मिळेना मुहूर्त
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

आंबेगाव बुद्रुक : महापालिकेत(pune carporation) समाविष्ट झालेल्या आंबेगाव खुर्द (ambegaon khurd)गावठाण परिसरात गेली एक महिने महापालिकेचा पाणी पुरवठा बंद (water supply close)असल्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. आंबेगाव खुर्द येथील चौडाई माता मंदिर परिसरातील जलवाहिनी ब्लॉक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. जेट मशीन द्वारे हे ब्लॉकेज काढले जाऊ शकते. पण जेट मशीन सध्या आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. कोट्यावधी खर्च असणाऱ्या महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जेट मशीन उपलब्ध नसणे ही लाजिरवानी बाब आहे. महापालिका अधिकऱ्यांना (carporation officer)संपर्क साधूनही अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

Pune Municipal Corporation
गोवा मुक्ती दिन; आग्वाद किल्ल्यातील काळरात्र

दरम्यान, आंबेगाव खुर्द येथील, शांताई हाईट्स, कांबळे हाईट्स, तानाजी पोटे हाईट्स, लक्ष्मी स्पर्श, कुलस्वामिनी हाईट्स, चौडाई हाईट्स, मोडक बिल्डिंग, तिकोटे हाईट्स आदी सोसायट्यांना गेली एक महिना पाणी मिळत नाही. तेवीस गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली तेव्हा महापालिकेकडून या गावांसाठी ऐंशी कोटीचा निधी मूलभूत सुविधांसाठी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु, या गावांची स्थिती व पालिका प्रशासनाची कामाची गती पाहता ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागणार की काय अशी स्थिती दिसते आहे. चौडाई माता मंदिर परिसरातील जलवाहिनी ब्लॉकेज असल्यामुळे माजी सरपंच अमर चिंधे यांनी स्वखर्चातून नागरिकांना टँकर द्वारे पाणी उपलब्ध करून दिले आहे. परंतु महापालिकेकडून मात्र ब्लॉकेज काढण्याला उशीर होतो आहे.पाणी प्रश्नामुळे मनस्ताप होत असल्याची तक्रार स्थानिक गृहिणी नंदा पोटे,सोनाली तिकोटे,वंदना कांबळे, गीता अहिवळे, पिंकी देवकर आदींनी केली आहे.

'महापालिकेकडे सतत पाठपुरावा करूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येते आहे. या आठवड्यात पाणीप्रश्न सोडविला नाही तर आंबेगाव खुर्द ग्रामस्थांच्या वतीने पाणीपुरवठा विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल व संबंधित अधिकाऱ्यांना काळे फसण्यात येईल.'

-अमर चिंधे, माजी सरपंच आंबेगाव खुर्द

Pune Municipal Corporation
परशुराम घाटातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होणार

'पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. त्यात आजरी असल्यामुळे मोठे हाल होत आहेत.गेली एक महिना पाण्यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे.

-अशा मोडक,गृहिणी

Pune Municipal Corporation
नांदेड : अर्धापूर नगरपंचायतीचा प्रचार शिगेला

'आंबेगाव येथील जलवाहिन्या ह्या ग्रामपंचायतीकडुन टाकण्यात आलेल्या आहेत.त्यावर सध्या इमारती बांधल्या गेल्या आहेत.त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. ब्लॉकेज काढण्यासाठी जेट मशीन द्वारे त्यातील ब्लॉकेज काढण्यात येईल. नागरिकांना पालिकेचे टँकर पाणी पुरवठा करत आहेत.

-कुणाल यादव, कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा विभाग स्वारगेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com