पिंपरी : सोसायट्यांमधील रहिवाशांना आता 'या' समस्येला द्यावे लागणार तोंड

water
water

पिंपरी : जसजसा उन्हाळा संपत आहे, तसतशा शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना पाण्याच्या संभाव्य टंचाईने ग्रासले आहे. कारण दर दोन वर्षांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची देखभाल दुरुस्तीसाठी यंदा त्यांना कामगारांची टंचाई जाणवत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पावसाळा पुढील महिन्यापासून सुरु होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोसायट्यांना त्यांच्याकडील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची तातडीने देखभाल दुरुस्ती करुन घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन वर्षांतून एकदा त्यांना हे करावे लागते. मात्र ही दुरुस्तीची कामे करणारे कामगार कोरोनामुळे गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे कामगारांची तीव्र टंचाई आहे. 
काय आहे सद्य:स्थिती महापालिकेकडून सोसायट्यांना होणारा पाणीपुरवठा त्यांच्या मागणीच्या तुलनेत कमी आहे.

कायद्यानुसार 2010 पासून झालेल्या गृहनिर्माण संस्थांना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांनी असे प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांमुळे सोसायट्यांची पाण्याची गरज बऱ्यापैकी भागते. बोअरवेलच्या (विंधनविहिर) माध्यमातून या पाण्याचा उपसा सोसायट्यांच्या टाक्‍यांमध्ये केला जातो. बोअरवेलला पाणी येण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरावे लागते. त्यासाठी शोषखड्डा केला जातो. या शोषखड्ड्यात एका पाईपद्वारे सोसायटीच्या आवारात साचणारे पावसाचे पाणी सोडले जाते. या शोषखड्ड्यात पालापाचोळा, कचऱ्याचे कण जाऊन तो बुजू शकतो. त्यामुळे त्याची साफसफाई करावी लागते. तसेच बोअरवेलचीही देखभाल दुरुस्ती करावी लागते. त्यासाठी कामगार नाहीत. 
अमृत योजनेचे फलित केंद्रसरकारच्या अमृत योजनेचे काम शहरात सुरु आहे. या प्रकल्पाचे काम डांगे चौक आणि थेरगाव येथे रखडले आहे. मार्चअखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील. त्यानंतर या योजनेतून सोसायट्यांना लागणारे पाणी देण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. 

धोका काय- 
या प्रकल्पासाठी सोसायट्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती न झाल्यास जमिनीत पूर्ण क्षमतेने पाणी मुरणार नाही. त्यामुळे पुरेसे पाणी न मिळाल्याने सोसायट्यांना पाण्याची तूट जाणवू शकते. तसे झाल्यास ही तूट कशी भरुन काढायची हा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. 

काय आहेत उपाययोजना 
महापालिकेने कबूल केल्याप्रमाणे सोसायट्यांना अनुदानित पद्धतीने टॅंकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा. कारण दरवर्षी उन्हाळ्यात स्वखर्चाने टॅंकर मागवून अनेक सोसायट्यांचे आर्थिक बजेट कोलमडलेले आहे. 

रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाबाबत 
- प्रकल्प उभारण्याचा सरासरी खर्च - सरासरी चार ते साडेचार लाख रुपये 
- रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असलेल्या सोसायट्या - 200 
- या प्रकल्पातून भागणारी पाण्याची एकूण गरज - 20 ते 30 टक्के 

महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी मार्चअखेरपर्यंत अमृत योजनेचे काम पूर्ण न झाल्यास गृहनिर्माण संस्थांना अनुदानित तत्वावर टॅंकरद्वारे पाणी देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र या प्रकल्पातूनही पाणी मिळाले नाही आणि सोसायट्यांना अद्याप अनुदानित पद्धतीने टॅंकर उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे महापालिकेने कामगार उपलब्ध करुन दिल्यास सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पांची देखभाल-दुरुस्तीची कामे करता येतील. 
-तेजस्विनी ढोमसे, अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com