सावधान हा महामार्ग आहे

हरिदास कड
सोमवार, 29 जुलै 2019

पुणे-नाशिक महामार्गावर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्गाला ओढ्याचे स्वरूप आले आहे. या पाण्यातून वाहने कशी चालवायची तसेच पायी जायचे कसे, असा प्रश्न वाहनचालक, पादचारी यांना पडला आहे.

चाकण ः पुणे-नाशिक महामार्गावर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्गाला ओढ्याचे स्वरूप आले आहे. या पाण्यातून वाहने कशी चालवायची तसेच पायी जायचे कसे, असा प्रश्न वाहनचालक, पादचारी यांना पडला आहे.
 
संततधार पावसाने पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात तसेच आंबेठाण चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने पाणी मार्गावर साचत आहे. चाकण (ता. खेड) व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने ओढे, नाले वाहू लागले आहेत. चाकण व परिसरात काही घरांत पाणी गेले आहे. अतिक्रमणे करून ओढे, नाले लहान केले गेल्याने ही अवस्था आहे. नाणेकरवाडी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक या ठिकाणी पर्यायी मार्ग पाण्याखाली बुडाले आहेत. पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. याकडे रस्ते कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, चाकण नगरपरिषद, नाणेकरवाडी ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही, असा आरोप नागरिकांचा आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water on Pune-Nashik Highway