शिरुर तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

टाकळी हाजी - पाणी पुरवठा योजनेचे योग्य व्यवस्थापन नाही. पाण्याच्या गळतीमुळे पाणी मिळत नाही अशी परिस्थिती असल्याने ''पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा'' देत चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील महिला व ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढला. 

टाकळी हाजी - पाणी पुरवठा योजनेचे योग्य व्यवस्थापन नाही. पाण्याच्या गळतीमुळे पाणी मिळत नाही अशी परिस्थिती असल्याने ''पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा'' देत चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील महिला व ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढला. 

मोरांच्या अस्थित्वामुळे कृषी पर्यटन असणारे गावाकडे पाणी प्रश्नाकडे ग्रामपंचायतचे प्रशासन दूर्लक्ष करीत असल्याने येथील शेतकरी, महिला, सर्वसामान्य नागरीक चिंता करू लागले आहेत. शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची हे गाव कृषी पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला आले आहे. येथील जनतेसाठी गणेगाव खालसा येथे विहीर घेऊन चासकमान उजव्या कालव्या पासून पाईपलाईन करण्यात आली आहे. येथून आलेले पाणी थेट विहीरीत न सोडता तलावात सोडलेले आहे. त्याठिकाणी सोडलेले पाणी येथील विहीरीत पाझरत आल्यावर गावाला पाणी पुरवठा केला जातो. या पाईप लाईनवर मोठ्या प्रमाणात गळती असल्याने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. दोन किंवा चार दिवसाने गावातील नागरीकांना दोन किंवा चार हांडे पाणी मिळते. येथील प्रशासनाचे पाणी पुरवठ्यावर नियंत्रण नाही अशी परिस्थिती आहे. 

या सर्व प्रश्नांची माहिती कमलताई नानेकर, निता नाणेकर, सोनाल नानेकर, आनंदा नानेकर, दत्ता करंजकर, राहुल नानेकर यांनी तक्रारी अर्ज करून दिला आहे. या तक्रारीची दखल घ्यावी म्हणून गावातून सवाद्य हंडा मोर्चा काढण्यात आला होता. ग्रामपंचायतीवर नेलेल्या या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर ग्रामसेवक पद्मिनी कोठवळे यांना तक्रारी अर्ज देण्यात आला. लकवरात लकवर कारवाई झाली नाही. तर पुढील मौर्चा गटविकास कार्यालयावर नेणार असल्याचे या महिलांनी सांगितले. 

दरम्यान ग्रामसेवक पद्मिनी कोठवळे म्हणाल्या की, दष्काळी परीस्थीती असल्याने या भागात पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी पुरवठा योजनेवरील एअरवॅाल नादुरूस्त आहेत. त्याचे काम सुरू केल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे. नव्याने बोअरवेल घेण्यासाठी ग्रामपंचायत चा निधी उपल्बध झाल्यास बोअरवेल घेतले जाईल. वेळ पडल्यास टॅंकरचा प्रस्थाव देण्यात 
येईल. दुष्काळी परीस्थीती असल्याने नागरीकांनी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

Web Title: Water question in Shirur taluka is serious