जादा पाणी घेतल्यावरून जलसंपदा विभाग नाराज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले होते. मात्र, महापालिकेने शनिवारी त्यापेक्षा जास्त म्हणजे 1380 एमएलडी पाणी घेतल्याच्या कारणावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी नाराजी व्यक्‍त केली. 

जलसंपदा विभागाने शहराच्या पाणीपुरवठ्यात अडीचशे एमएलडीने कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी खडकवासला जलाशयातील दोन विद्युत पंप बंद केले होते; परंतु या निर्णयावरून बराच वाद निर्माण झाला. त्यानंतर महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याचे ठरले. 

दरम्यान, जलसंपदामंत्री महाजन यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन पाणीप्रश्‍न मार्गी लावण्यात येईल. तोपर्यंत महापालिकेला 1350 एमएलडी पाणी देण्यात येईल, असे सांगितले; परंतु महापालिकेने पुन्हा पाणी जास्त घेतल्यावरून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आळविला.

Web Title: Water resources department annoyed after taking excess water