पाणीबचतीसाठी सोसायट्यांचे वेळापत्रक

पीतांबर लोहार
गुरुवार, 24 मे 2018

पिंपरी - टोलेजंग इमारतीत हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले. मात्र, महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. टॅंकर, बोअरवेल किंवा खासगी शेतकऱ्यांच्या विहिरींचा आधार घ्यावा लागतोय. त्यासाठी सोसायटीचा खर्च वाढतोय. त्याचा भार सदनिकाधारकांवर पडतोय. त्यातून पाणीबचतीची संकल्पना पुढे आली. ती सर्वांनी उचलून धरली. पाणीपुरवठ्याबाबत वेळापत्रक बनविले आणि प्रश्‍न सुटला. चिखली-मोशी परिसरातील सोसायट्यांचा हा पाणीबचतीचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

मोशी, चिखली परिसरात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. आणखी बांधकामे सुरू आहेत. अनेक जण राहायला गेले आहेत. मात्र, त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. लाखो रुपये पाणीपट्टी भरूनही खासगी व्यक्तींकडून पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे बहुतांश सोसायट्यांनी पाणीबचतीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

उपलब्ध स्रोतानुसार पाण्याचे नियोजन करतो. पाणी साठवून काटकसरीने वापरतो. फक्त स्वयंपाक घरातील नळांना पाणी सोडतो. यामुळे पाणी वाया जात नाही. सोसायट्यांतील सर्व सहकाऱ्यांनी पाणी बचतीला महत्त्व दिलेले आहे.
- विजय आवटे, पदाधिकारी, स्वराज हाउसिंग सोसायटी

आम्ही नियोजन केले, तुम्ही? 
सह्याद्री श्रृभेरी सोसायटीचे पदाधिकारी गोविंद घडलिंगे म्हणाले, ‘‘बिल्डरने आम्हाला जलशुद्धीकरण प्रकल्प बांधून दिला आहे. सध्या आम्ही त्याचे भाडे देत आहोत. त्याद्वारे पिण्याचे पाणी मिळत असून त्याचे नियोजन केले आहे. सकाळी साडेआठ ते नऊ आणि सायंकाळी साडेसात ते आठ या वेळेतच पाणीपुरवठा करतो.’’ अंजनी गाथा सोसायटीचे पदाधिकारी संदीप बोरसे म्हणाले, ‘‘महापालिकेकडून आम्हाला पाणीपुरवठा होत नाही. रोज चार टॅंकरद्वारे पाणी मागवावे लागते. त्यामुळे सोसायटीतील पाणी सोडण्याच्या वेळा ठरविल्या. सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळेत पाणी सोडले जाते.’’ स्वराज्य सोसायटीचे पदाधिकारी विजय आवटे म्हणाले, ‘‘आम्ही सात बोअरवेल घेतल्या होत्या. त्यातील दोनच सध्या सुरू आहेत. शेजारील एका शेतकऱ्याकडून बोअरवेलचे व दुसऱ्या शेतकऱ्याकडून विहिरीचे पाणी विकत घेतो. सकाळी आठ ते नऊ आणि रात्री नऊ ते दहा या वेळेत सोसायटीत पाणी सोडले जाते.’’

Web Title: water saving society time table