मार्चपासून पाणीकपात अटळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे - पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. मात्र, खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पाहता महापालिकेकडून असाच वापर सुरू राहिल्यास मार्चपासून पाणीकपात अटळ असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत सध्या १७.२० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो चार टीएमसीने कमी आहे. या प्रकल्पातून पुणे शहरासाठी पाणी घेण्याच्या मुद्द्यावरून जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला दररोज ८९२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घ्यावे, असे आदेश दिले आहेत. परंतु शहराची लोकसंख्या आणि लगतच्या गावांसाठी एवढे पाणी पुरेसे नाही. यासाठी प्राधिकरणाकडे नव्याने मागणी करण्यात येणार आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत महापालिकेने ११५० एमएलडी पाणी घ्यावे, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. परंतु महापालिका दररोज १३५० एमएलडी पाणी घेत आहे.

रब्बीचे आवर्तन लांबणार
जलसंपदा विभागाकडून रब्बी हंगामासाठी १० जानेवारीपासून आवर्तन सोडण्यात येणार होते; परंतु कालव्यातील दुरुस्तीची कामे सुरू आहेत, त्यामुळे रब्बीचे आवर्तन आठवडाभर लांबण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Water Shortage from march