मुंढव्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मुंढवा - गेल्या काही दिवसांपासून परिसरात कमी दाबाने पाणी येते. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असून, पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

धायरकर कॉलनी, वडबन, सर्वोदय कॉलनी, मुंढवा गावठाण, गायकवाड आळी, गवळी आळी व महात्मा गांधी चौक परिसरात सध्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे. त्यामुळे महिला व नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येतून मार्ग निघणार तरी कधी, असा प्रश्‍न लक्ष्मी मसुडगे यांनी उपस्थित केला आहे. 
सुदेश पाटील म्हणाले, ‘‘पाणी समस्येबाबत अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.’’ 

रंजना जाधव म्हणाल्या, ‘‘अवेळी पाणी सोडले जात आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही वेळात बदल केला जात नाही.’’ जावेद शेख म्हणाले, ‘‘कमी दाबाने पाणी येत असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे.’’

या भागातील पाण्याच्या समस्येची लवकरच पाहणी केली जाईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.
- इंद्रजित देशमुख, कनिष्ठ अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग

Web Title: water shortage in mundhawa

टॅग्स