पाणीकपातीविरोधी ‘राष्ट्रवादी’चे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

काँग्रेस, मनसेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील पाणीकपातीला तीव्र विरोध दर्शवीत महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी (ता. ४) निषेध आंदोलन केले. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी निवेदन स्वीकारून लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

पिंपरी - काँग्रेस, मनसेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील पाणीकपातीला तीव्र विरोध दर्शवीत महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी (ता. ४) निषेध आंदोलन केले. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी निवेदन स्वीकारून लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुमन पवळे, संगीता ताम्हाणे, नगरसेवक अजित गव्हाणे, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर, संजय वाबळे, प्रवक्ते फजल शेख यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

शरद पवारांनी सांगितलं, अजित पवार भाजपसोबत का गेले?

शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, ‘‘महापालिकेने २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. समन्यायी पाणी वाटपासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. परंतु, दिवसाआड पाणीपुरवठा करूनही तक्रारी कमी झाल्या नाहीत. पाण्याचा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. मुबलक पाणीसाठा असतानादेखील पाणी कपातीचा निर्णय शहरवासीयांच्या माथी मारून त्यांना वेठीस धरले जात आहे.’’

विरोधी पक्षनेते काटे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. प्रशासनाला त्याचे नियोजन करता आले नाही. प्रशासन आपल्या चुका नागरिकांच्या माथी मारत आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तत्काळ पाणी कपात रद्द करण्यात यावी. ’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water shortage oppose agitation by ncp