पाणीकपातीवर जलसंपदा ठाम

Water
Water

पुणे - जलसंपदा विभाग पुणे शहराला दररोज ११५० एमएलडी पाणी देण्यावर ठाम आहे. या पाणीकपातीनंतर जलसंपदाकडून आता येत्या सोमवारपासून (ता. १५) रब्बी पिकांच्या आवर्तनासाठी उजव्या मुठा कालव्यातून साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला दररोज १३५० एमएलडी पाणी देण्यात येत होते. कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत ११५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आठ ऑक्‍टोबर रोजी झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्‍त आदी उपस्थित होते. 

सुमारे २३ वर्षांपूर्वी शहराची २०२१ मधील लोकसंख्या गृहीत धरून खडकवासला प्रकल्पातून दरवर्षी ११.५० टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी महापालिकेने साडेसहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जलसंपदा विभागाला देण्याचा करार झाला; परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. खडकवासला प्रकल्पातील पाण्यावर सुमारे ७६ हजार हेक्‍टर इतके सिंचनाचे क्षेत्र अवलंबून आहे; परंतु पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले. पालिकेकडून शहरासाठी खडकवासला धरणातून, धरणातील बंद पाइपलाइनमधून, पर्वती येथील कॅनॉल आणि लष्कर येथील कालव्यातून पंपहाउसद्वारे पाणी उचलले जाते. रबी पिकांच्या आवर्तनासाठी येत्या १५ ऑक्‍टोबर ते २३ नोव्हेंबर यादरम्यान कालव्यातून पाणी देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंढे यांनी दिली.

पुण्याची लोकसंख्या सुमारे ४० लाख आहे. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी देय असताना त्यांच्याकडून २०१७-१८ या वर्षात सर्वाधिक १८.७१ टीएमसी इतका पाणीवापर झाला आहे. 
 - टी. एन. मुंढे, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com