विश्रांतवाडीत ‘पाणी परीक्षा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

विश्रांतवाडी - धानोरी, मुंजाबावस्ती, शेवाळे पार्क, गोकुळनगर, भैरवनगर, चौधरीनगर, माधवनगर, कमल पार्क, सिद्धार्थ नगर आदी भागांतील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागात दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात व परीक्षांच्या काळात महापालिका नागरिकांचीच ‘परीक्षा’ घेत आहे. 

या भागात व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी विद्यानगर पंपिंग स्टेशनपासून शेवाळे पार्कपर्यंत १२ इंची जलवाहिनी टाकण्यात आली आहे; परंतु ती अद्याप सुरू करण्यात आली नाही; तसेच पाणी साठवणुकीसाठी नव्या टाक्‍याही बांधण्यात आल्या आहेत; परंतु त्याही सुरू करण्यात आल्या नाहीत. तक्रार करूनही अधिकारी  पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष देत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

या संदर्भात नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘विद्यानगर येथील पंपिंग स्टेशनची मोटर सहा महिन्यांपासून बंद आहे. ती दुरुस्त करण्यासाठी वारंवार आम्ही प्रशासनाला पत्र देऊनही त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे भैरवनगर भागाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.’’

Web Title: water shortage vishrantwadi