पुणे जिल्ह्यात आताच टॅंकरची पन्नाशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पुणे जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यांत भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे.

पुणे - जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यांत भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे.

संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस पडत असताना पुणे जिल्ह्यात मात्र पूर्वेकडच्या भागात पावसाची अजूनही पाठच आहे. त्यामुळे खरीप धोक्‍यात आला असून, पिकांसह गावेही तहानलेली आहेत. बारामती तालुक्‍यात सर्वाधिक १५ टॅंकर सुरू असून १५
गावे व १४५ वाड्या तहानलेल्या आहेत. 

इंदापूर तालुक्‍यात १४ टॅंकर सुरू असून, १२ गावे व ५८ वाड्यांतील ३२ हजार ८१९ लोकांना पाणी पुरवले जात आहे. दौंड तालुक्‍यात ९ टॅंकरने ७ गावे व ५० वाड्यांना, तर पुरंदर तालुक्‍यात ५ गावे व ६४ वाड्यांना ११ टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. या चार तालुक्‍यांमध्येच सध्या टॅंकर सुरू असून, एक लाख लोकांना हे पाणी पुरवले जात आहे. याखेरीज आंबेगाव तालुक्‍यातही १ गाव व ७ वाड्यांतील ८३१ लोकांना एका टॅंकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Water Supply by Tanker