खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

खडकवासला - पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणांच्या क्षेत्रात सोमवारी पुन्हा पाऊस सुरू झाला. रविवारी कोणत्याही धरणात पाऊस पडला नाही, तरी एका दिवसात सुमारे ०.१२० टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. या चारही धरणांत मिळून रविवारी सकाळी सहा वाजता ३.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. तो २४ तासांनंतर ३.५४ टीएमसी झाला. म्हणजे ०.०७० टीएमसी वाढ (येवा) दिसते. त्याचबरोबर ०.०५० टीएमसी हे शहर पाणीपुरवठ्यासाठी सोडले. हे दोन्ही मिळून ०.१२० टीएमसीची प्रत्यक्षात वाढ झाली आहे, तर वरील पद्धतीने सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ०.१९५ टीएमसी वाढ झाल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या नोंदीनुसार दिसत आहे.

खडकवासला - पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणांच्या क्षेत्रात सोमवारी पुन्हा पाऊस सुरू झाला. रविवारी कोणत्याही धरणात पाऊस पडला नाही, तरी एका दिवसात सुमारे ०.१२० टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. या चारही धरणांत मिळून रविवारी सकाळी सहा वाजता ३.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. तो २४ तासांनंतर ३.५४ टीएमसी झाला. म्हणजे ०.०७० टीएमसी वाढ (येवा) दिसते. त्याचबरोबर ०.०५० टीएमसी हे शहर पाणीपुरवठ्यासाठी सोडले. हे दोन्ही मिळून ०.१२० टीएमसीची प्रत्यक्षात वाढ झाली आहे, तर वरील पद्धतीने सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ०.१९५ टीएमसी वाढ झाल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या नोंदीनुसार दिसत आहे. मागील काही वर्षांच्या अनुभवानुसार दरवर्षी जून महिन्यात जास्त पाऊस पडत नाही. साधारणतः जुलै महिन्यात किंवा अनेक वेळा १५ जुलै रोजी खऱ्या अर्थाने पावसाला सुरवात होत असते. एक जूनपासून टेमघर येथे ५००, पानशेत, वरसगावला ३२९ व खडकवासला येथे १६१ मिलिमीटर पाऊस पडल्याचे पाटबंधारे विभागाने  सांगितले.

जुलैमध्ये मुसळधार पावसाला सुरवात होते. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दरवर्षी १५ ऑगस्ट किंवा ऑगस्टअखेर चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा होतो. त्यामुळे, पाणी कपातीची गरज नाही. मात्र, धरणात कितीही पाणी असले तरी नागरिकांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

मागील वर्षीच्या आजच्या दिवशी चारही धरणांतील पाणीसाठा - ४.७८ 
टीएमसी (टक्केवारी १६.३९)
चार धरणांतील आजचा पाणीसाठा - ३.५९ टीएमसी (टक्केवारी १२.३१)
महापालिकेचा दर महिन्याला पाणीवापर - १.५० टीएमसी
सध्या २४ तासांत होत असलेली वाढ - ०.१२० टीएमसी

Web Title: Water Storage Increase in Khadakwasala Dam