खूशखबर! उजनी @प्लस 37; शेतकऱ्यांना दिलासा

प्रा. प्रशांत चवरे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पुणे, अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱी, उदयोजक व सामान्य नागरिकांसाठी उजनी धरण अत्यंत महत्वाचे आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ही ११७ टी.एम.सी. आहे. त्यापैकी ६३.६५ टी.एम.सी. पाणीसाठी मृत पाणीसाठा आहे तर ५३.५७ टी.एम.सी. पाणीसाठा उपयुक्त आहे. चालु वर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापुर, दौंड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व सोलापुर जिल्ह्यातील करमाळा आदी तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांची नजर उजनी धरणावर होती

भिगवण : उजनी धरण परिसरामध्ये मागील आठवडयापासुन सुरु असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.३०) उजनी धऱण प्लसमध्ये आल्यानंतर मागील चार दिवसांमध्ये त्यामध्ये समाधानकारक वाढ होऊन उपयुक्त साठयापैकी एक तृतीयांश पाणी साठा धरणामध्ये झाला आहे. सध्या धरणामध्ये ८३.५२ टी.एम.सी. पाणीसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी ३७.०८ इतकी आहे. धरणामध्ये हा विसर्ग कायम राहिल्यास १५ ऑगस्ट पुर्वी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

पुणे, अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱी, उदयोजक व सामान्य नागरिकांसाठी उजनी धरण अत्यंत महत्वाचे आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ही ११७ टी.एम.सी. आहे. त्यापैकी ६३.६५ टी.एम.सी. पाणीसाठी मृत पाणीसाठा आहे तर ५३.५७ टी.एम.सी. पाणीसाठा उपयुक्त आहे. चालु वर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापुर, दौंड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व सोलापुर जिल्ह्यातील करमाळा आदी तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांची नजर उजनी धरणावर होती.

२७ जुलै अखेर धरणांमध्ये वजा २६ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये खरीपाच्या पीक लागवडीवर मोठा परिणाम जाणवत होता. परंतु २८ जुलैपासुन धरण क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या दमदार पावसांमुळे धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढला आहे. ३० जुलै रोजी धरण प्लसमध्ये आले तर सध्या धरणांमध्ये ३७.०८ टक्के उपयुक्त पाणी साठा झाला आहे. एकुण उपयुक्त पाणीसाठ्यापैकी एक तृतीयांश उपुयक्त पाणी साठा झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

धऱणातील पाणीसाठा वाढल्यामुळे या भागामध्ये रखडलेल्या आडसाली ऊस लागवडीस चालना मिळाली आहे. त्याच बरोबर नदीपात्राच्या बाजुच्या शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरण्याही सुरु केल्या आहे. धऱणामध्ये सध्याचा विसर्ग सुरु राहिल्यास १५ ऑगस्टपर्यंत धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे. 

उजनी धऱणातील धरणातील  पाणीपातळी :
एकूण पाणीपातळी -   ४९३.५६०   मीटर
एकूण पाणीसाठा  -   २३६५.३२  दलघमी
उपयुक्त  साठा   -   ५६२.५१ दलघमी
एकुण पाणीसाठा  -   ८२.२९टी.एम.सी.
उपयुक्त साठा    -   १८.८६ टी.एम.सी.
टक्केवारी       -   ३७.०८ टक्के
दौंड विसर्ग      -   ६६८९३    क्यूसेक
बंडगार्डन       -    ५२०००    क्यूसेक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water storage increased in Ujani Dam