पाणीसाठा साडेसहा टीएमसीने कमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

खडकवासला प्रकल्पामधील काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात तुरळक पाऊस झाला; परंतु गुरुवारी एकाही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक थेंबही पाऊस झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजअखेर प्रकल्पात साडेसहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेतील परिस्थिती
पुणे - खडकवासला प्रकल्पामधील काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात तुरळक पाऊस झाला; परंतु गुरुवारी एकाही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक थेंबही पाऊस झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजअखेर प्रकल्पात साडेसहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात खडकवासला प्रकल्पामधील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला, त्यामुळे पुण्यावर ओढवलेले पाण्याचे संकट काही प्रमाणात दूर झाले. परंतु पावसाने पुन्हा दडी मारली आहे, त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. सध्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा क्षमतेच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (ता. 18 जुलै, सायंकाळी पाचपर्यंत)
धरण क्षमता पाणीसाठा टक्‍केवारी पाऊस (मिलिमीटर)

 (टीएमसी) (टीएमसी)
टेमघर 3.71 0.98 26.46 00
वरसगाव 12.82 5.65 44.08 00
पानशेत 10.65 5.90 55.44 00
खडकवासला 1.97 1.73 87.75 00
एकूण क्षमता 29.15 एकूण पाणीसाठा : 14.26 (48.95 टक्‍के)
गतवर्षीचा साठा : 20.73 (71.09 टक्‍के)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Storage in Khadakwasala Project Rain