पुणे शहरात पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित

पुणे  शहरात पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित

पुणे - शहरात सर्वत्र सलग पाच तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेत आता पुन्हा गोंधळ निर्माण झाला असून, या योजनेचे वेळापत्रक बिघडल्याने काही भागांत अपुरा आणि अवेळी पाणीपुरवठा होत आहे. सणासुदीत ज्या भागांत तीन-चार तास पाणी येत होते, त्या भागांत तासभरही पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. पेठांतील काही परिसरात रविवारी पुन्हा पाणीपुरवठा विस्कळित झाला. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. 

शहराच्या पाणीसाठ्यामध्ये कपात झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र वेगवेगळ्या भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा असल्याने त्यावर तोडगा म्हणून, संपूर्ण शहरात एकसमान म्हणजे, पाच तास पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तेही पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असेही सांगण्यात आले होते. तसे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. त्यामुळे लोकांना पुरेसे पाणी मिळण्याची आशा होती. प्रत्यक्षात वेळापत्रकानुसार नियोजन न केल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काही भागांत तर तास ते दीड तासच पाणी येत असल्याच्या तक्रारी रविवारी आल्या. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘सर्व भागांत वेळापत्रकानुसार पाणी सोडण्यात येत आहे. तरीही, लोकांच्या तक्रारी जाणून तेथे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com