पु्ण्यातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

महापालिकेच्या वारजे जलकेंद्राच्या आवारातील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.5) या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोथरुड, बावधन, बालेवाडी, पाषाण, सूसमधील लोकांना एक दिवस पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

पुणे : महापालिकेच्या वारजे जलकेंद्राच्या आवारातील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.5) या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोथरुड, बावधन, बालेवाडी, पाषाण, सूसमधील लोकांना एक दिवस पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (ता.6) उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे. या केंद्राच्या आवारातील आवश्‍यक ती कामे तातडीने करण्यात येणार असून, त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी कळविले आहे. 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : (चांदणी चौक टाकी) : उजवी, डावी भुसारी कॉलनी,परमहंस नगर,भूगाव, बावधन, पाषाण-गावठाण, शास्त्रीनगर,सूस टाकी, सुतारवाडी,बालेवाडी,म्हाळुंगे,विधाते वस्ती,मुरकुटे वस्ती,म्हाळुुंगे गाव,सूस गाव, सूस रस्ता, मोहनगर आणि परिसर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Supply Closed on Thursday in few area of Pune