esakal | बारामतीतील उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामती येथील एमआयडीसीमधील काही उद्योगांना पाणीटंचाईचा फटका बसत असून, काही उद्योगांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. या संदर्भात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे. 

बारामतीतील उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती येथील एमआयडीसीमधील काही उद्योगांना पाणीटंचाईचा फटका बसत असून, काही उद्योगांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. या संदर्भात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे. 

बारामतीतील कोऱ्हाळे येथील ज्येष्टाचा कोरोनाने मृत्यू

बारामती एमआयडीसीतील "जी" विभागात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. याबाबत उद्योजकांच्या अनेक दिवसांपासून तक्रारी आहेत. उजनी जलाशयात पुरेसा पाणीसाठा असताना देखील केवळ हलगर्जीपणामुळे एमआयडीसी उद्योगांना पाणी पुरवू शकत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचा आरोप इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केला आहे.  

दौंड तालुक्यातील गिरीम येथे 21 लाखांचा गांजा जप्त

पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार संपर्क साधून तक्रारी करत आहेत, परंतु संबंधित अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. लॉकडाउनमुळे अगोदरच उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि आता केवळ एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे मोठी किंमत मोजून पाणी टॅंकरद्वारे विकत घ्यावे लागत असल्याने उद्योजक मेटाकुटीस आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दिलासादायक, जुन्नर तालुक्यातील ही पाच गावे झाली कोरोनामुक्त

उद्योगांना त्वरित नियमित व पुरेसा पाणी पुरवठा न झाल्यास उद्योजक कायदेशीर मार्गाने आंदोलन करतील, असा इशारा बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिका-यांनी दिला आहे. 

मंचरला आठवडे बाजार भऱणार तोही दोन दिवस

धनंजय जामदार,  उपाध्यक्ष शरद सुर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेश्याम सोनार, सदस्य मनोहर गावडे, महादेव गायकवाड, संभाजी माने, शेख वकील, चारूशीला धुमाळ, हरिष कुंभरकर, धनंजय धुमाळ आदींनी बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जोशी यांना निवेदन दिले. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचे जामदार यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उजनी जलाशयामधील एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारे जॅकवेल खोल नदीपात्रात नुकतेच स्थलांतर करण्यात असून, त्याची चाचणी चालू आहे. नविन जॅकवेल व्यवस्थित कार्यांन्वीत होताच विस्कळीत पाणीपुरवठा वैयक्तिक लक्ष घालून तातडीने नियमित करण्यात येईल.
 - संजय जोशी
अभियंता, बारामती एमआयडीसी