#WaterCrises पुण्यात पाणीपुरवठा विस्कळित

#WaterCrises पुण्यात  पाणीपुरवठा विस्कळित

पुणे  - धरणात पाणीसाठा कमी असला, तरी पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाने केली; प्रत्यक्षात मात्र शहराच्या वेगवेगळ्या भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले. डेक्कन आणि शिवाजीनगर परिसरात काही वस्त्यांमधील पाणीपुरवठा अद्यापही विस्कळित आहे. आपटे रस्ता परिसरात गेली तीन दिवस पाणी न आल्याने येथील रहिवाशांना टॅंकरद्वारे पाणी पुरवावे लागले.

संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. २८) बंद राहणार असल्याने नागरिकांचे हाल होण्याची भीती आहे. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार पाणी पुरविण्यात येत असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी सांगितले. सध्या शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु त्यासाठी वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. परिणाम, अनेक भागांत अपुरे आणि अवेळी पाणी येत असल्याचे दिसून आले. सतत रस्त्यावर उतरून आंदोलन करूनही शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यापाठोपाठ आपटे रस्ता परिसरातील दोन वसाहतींमध्ये चार दिवसांपासून पाणी आलेले नाही. त्यामुळे रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत, आंदोलनाची तयारी करताच महापालिकेने टॅंकर पुरविले; परंतु पाण्याच्या आशेने टॅंकरकडे धाव घेतलेल्या महिलांना जेमतेमही पाणी मिळाले नाही. त्यामुळे टॅंकर येऊनही महिलांना प्रचंड धावपळ करावी लागली. लोकांचे प्रचंड हाल होऊनही ना नगरसेवक... ना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने रहिवाशांची अडचण समजून घेतली. त्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘शहरात सर्वत्र पाणीपुरवठा होत आहे. ज्या भागात पाणी आले नाही, त्याची पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. आपटे रस्ता येथील लोकवस्त्यांना पुरेसे पाणी देण्यात येत आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com