निवडणुकीच्या धसक्‍याने मुबलक पाणी

Water-Supply
Water-Supply

पुणे - पावसाळ्यातच पुणेकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या नाराजीचा निवडणुकीत फटका बसण्याची ओरड राजकीय पक्षांकडून होताच पुणेकरांना रोज पुरेसे पाणी पुरविण्याच्या हालचाली महापालिकेने केल्या आहेत.

वडगाव जलकेंद्रांतर्गतची पाणीकपात थांबवून सर्वत्र सलग पाच तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिका करीत आहे. दरम्यान, येत्या चार दिवसांत संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

शहरात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांना रोज एकवेळ म्हणजे सलग पाच तास पाणी पुरविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते.

मात्र, उलटपत्री नियोजनाचे कारण पुढे करीत वडगाव जलकेंद्रातंर्गत विविध भागांत आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येत आहे. तसेच, बहुतांशी अपुरे आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.

पाण्याबाबत तक्रारी करून दखल घेतली जात नसल्याने ऐन पावसाळ्यात लोकांचे पाण्याविना हाल होत आहेत. पाण्याच्या मागणीवर गेल्या महिन्यात रहिवाशांनी आंदोलनाचाही पवित्रा घेतला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नेत्यांकडे पाणी पुरविण्याची मागणी प्राधान्याने केली जात आहे. चार चार-दिवस पाणी येत नसल्याची गाऱ्हाणे रहिवासी मांडत असल्याने उमेदवारांच्या चिंतेत भर पडत आहे.

पाणीटंचाईचा धसका सर्वच राजकीय पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना पूर्वीप्रमाणे पुरेसे पाणी देण्याची सूचना महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी प्रशासनाला केली आहे. तांत्रिक अडचणी दूर करा. देखभाल-दुरुस्ती करून घ्या, पण आता आधी पाणी द्या, अशी मागणी पक्षांनी केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होण्याची कारणे जाणून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘वितरण व्यवस्थेमुळे वडगाव जलकेंद्रांतर्गत एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. तो पूर्ववत करण्यात येईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com